Sangli Grampanchayat Election: जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली फॉरेन रिटर्न असणारी यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही सांगली जिल्ह्यातील 'वड्डी' ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी निवडून आली आहे. या निवडणुकीत शिंदे यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला असून सर्व जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. (Latest Marathi News)
वड्डी हे सांगली (Sangli) जिल्ह्यातील मिरज शहरालगत असलेलं पाच हजार लोकवस्तीचं छोटंसं गांव आहे. या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विकासाचा मुद्दा उपस्थित करत जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली तरुणी यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही निवडणुकीत सरपंच पदाची उमेदवार झाली होती. परदेशाप्रमाणे शुद्ध पिण्याचं पाणी, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा गावकऱ्यांपर्यंत पोहोचतच का नाहीत? या विचारातून या मुलीने थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली. (Yashodhara Mahendrasingh Shinde Wins Waddi Gram Panchayat)
शाळेत शेकड्यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनी असताना सगळ्यांत मिळून एकच कॉमन टॉयलेट का? विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार ते का नाहीत? परदेशासारखे शाळेत किंवा काही विशिष्ट ठिकाणी सेनेटरीपॅडचे व्हेंडिंग मशीन्स आपल्या गावखेड्यात का नाहीत? असे प्रश्न घेवून तिने निवडणुकीचा प्रचार केला. यशोधराने परदेशात पाहिलं तसंचं गाव आणि समाज माझ्या गावात बनला पाहिजे हे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून यशोधराने ही निवडणूक लढवली. तसेच विकासाचे मॉडेल गावागावात विकसित व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा ती व्यक्त करताना दिसते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.