Maharashtra GBS: Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra GBS: भीती वाढली! पुणे- सोलापूर- मुंबई-नागपूरनंतर अमरावतीत GBS चा शिरकाव; राज्यातील मृतांचा आकडा १४ वर

Guillain-Barré Syndrome: पुणे, सोलापूर, मुंबई, नागपूर, धुळेनंतर आता अमरावतीमध्ये जीबीएसने शिरकाव केला आहे. अमरावतीमध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Priya More

जीबीएस आजाराने राज्यामध्ये चिंता वाढवली आहे. या आराजाचे एकापाठोपाठ एक रुग्ण आढळत आहे. जीबीएसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहेत्याचसोबत मृतांचा आकडा देखील वाढत चालला आहे. पुणे, सोलापूर, मुंबई, नागपूर, सांगली, कोल्हापूर आणि धुळ्यानंतर आता अमरावतीमध्ये जीबीएसने शिरकाव केला आहे. अमरावतीमध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला आहे.

अमरावतीत पहिला जीबीएसचा रुग्ण पॉझिटिव्ह झाला आहे. पुण्यावरून गावी आलेल्या ६५ वर्षीय रुग्ण जीबीएस पॉझिटिव्ह आला आहे. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णाची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील अष्टगाव येथील ही व्यक्ती १२ दिवसांपूर्वी पुण्याहून प्रवास करून आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र या पहिल्या जीबीएस रुग्णामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यामध्ये जीबीएस आजारामुळे चिंता वाढली आहे. पुण्यात आणखी एका जीबीएस रुग्णाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३४ वर्षीय तरुणाचे रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. हा तरुण वोघलीमध्ये राहत होता. १५ फेब्रुवारीला सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास या तरुणाला उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या रुग्णाला श्वसनाला त्रास होत होता आणि स्नायू खूपच कमजोर झाले होते.

पुण्यातील जीबीएसने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. तर राज्यातील जीबीएस रुग्णांच्या मृत्यूचा आकडा १५ वर गेला आहे. पुण्यानंतर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आजाराबाबत आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचा भडका! शिंदे सेना-भाजप आमनेसामने

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धमकी देणारा त्यांच्याच जवळचा, ओबीसी नेत्याच्या दाव्याने खळबळ

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

SCROLL FOR NEXT