GBS Syndrome Disease Patient Saam Tv
महाराष्ट्र

GB Syndrome Outbreak: पुण्यात जीबीएसच्या रुग्णसंखेत सातत्याने वाढ; रुग्णांची संख्या १५८ वर

GB Syndrome Outbreak: महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगाल, राजस्थानमध्येही जीबी सिंड्रोमचे रुग्ण आढळले आहेत. यानंतर तेलंगणामध्येही एका महिलेमध्ये जी बी सिंड्रोम आजाराचे लक्षणे आढळलेत.

Bharat Jadhav

पुण्यात जीबी सिंड्रोमची संकट कायम असून पुणे शहर या आजाराचं हॉटस्पॉट होऊ लागलंय. आज परत नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून जीबी सिंड्रोम रुग्णांची संख्या थेट १५८ वर पोहोचलीय. आज ३ नवीन संशयित GBS रुग्णांची नोंद झालीय. नवीन रुग्णांची नोंद करण्यासह आज ३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर जीबीएस आजार संशयित ५ रुग्णांचा मृत्यू झालाय. पुण्यात प्रदूषित पाण्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याची शंका आरोग्य खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगाल, राजस्थानमध्येही जीबी सिंड्रोमचे रुग्ण आढळले आहेत. यानंतर तेलंगणामध्येही एका महिलेमध्ये जी बी सिंड्रोम आजाराचे लक्षणे आढळलेत. पुण्यात आज परत नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. पुण्यात एकूण १५८ रुग्ण संख्या झालीय. यात ३१ रुग्ण पुणे मनपा, तर ८३ रुग्ण सिंहगड रोड, किरकिटवाडी, नांदोशी आणि याच परिसरातील काही गावांमधील आहेत . पिंपरी चिंचवड १८, पुणे ग्रामीण १८, आणि ८ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत.

पुण्यात आज परत नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. पुण्यात एकूण १५८ रुग्ण संख्या झालीय. यात ३१ रुग्ण पुणे मनपा, तर ८३ रुग्ण सिंहगड रोड, किरकिटवाडी, नांदोशी आणि याच परिसरातील काही गावांमधील आहेत. पिंपरी चिंचवड १८, पुणे ग्रामीण १८, आणि ८ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. जीबीएस हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. हे शरीराची रोग प्रतिकारक प्रणाली मज्जासंस्थेवर हल्ला करत असते.

या आजारामुळे स्नायूमध्ये कमकुवतपणा येतो आणि गंभीर आजारांमध्ये अर्धांगवायू होतो. आजपर्यत एकूण १५८ संशयित रुग्ण सापडलेत. तसेच ५ संशयित मृत्यूची नोंद झालीय. यापैकी १२७ रुग्णांना जीबीएसची लागण निदान झाले आहे. तर ४८ रुग्ण आयसीयुमध्ये आहेत, २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

या आजाराची सर्वसाधारण लक्षणे काय आहेत

अ) अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा

ब) अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील ञास किवा कमजोरी.

क) डायरिया (जास्त दिवसांचा)

आतापर्यत केलेल्या उपाययोजना राज्यस्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाने बाधित भागाला त्वरित भेट दिलीय. पुणे मनपा व जिल्ह्याला बाधित भागामध्ये सर्वेक्षण सुरु करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना मारहाण, शरीराला अनेक फ्रॅक्चर?

Maharashtra Live News Update: जयसिंगपूरमध्ये 24 वी ऊस परिषद पार, १८ ठराव पास

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

Manoj Jaranage: जरांगेंचं आंदोलन ठरलं फुसका बार? तायवाडेंनी केली कुणबी प्रमाणपत्रांची पोलखोल

Ayushman Bharat Yojana: आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोणकोणत्या सेवा मोफत मिळतात?

SCROLL FOR NEXT