Gautam Adani Meets Sharad Pawar: प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली आहे. सिल्व्हर ओक या निवसस्थानी जाऊन आदानी यांनी पवारांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी वर्षा निवसस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर काही मिनिटांतच अदानी यांनी पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
पवारांनी सांगितलं अदानींच्या भेटीमागचं कारण
या भेटीविषयी बोलताना पवार म्हणाले, सिंगापूरचे काही लोक माझ्याकडे आले होते. काही तांत्रिक मुद्द्यावर त्यांना उद्योजक गौतम अदानी यांची भेट घ्यायची होती. म्हणून गौतम अडाणी आणि सिंगापूरचे शिष्टमंडळ यांची भेट झाली. तो तांत्रिक विषय आहे. मला काही जास्त त्यातला समजत नाही, असे पवार म्हणाले.
काही वेळापूर्वी पवार मुख्यमंत्र्यांना भेटले
विशेष म्हणजे अदानी-पवार भेटीच्या काही वेळापूर्वी शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतील. शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदा शरद पवार हे वर्षा निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Political News)
मुख्यमंत्र्यांनी सांगितले भेटीमागचं कारण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीमागचं कारण सांगितलं आहे. ते म्हणाले आहेत की ''या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. ही सदिच्छा भेट होती.'' मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्ष पूर्ण झाली असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पवार यांनी निमंत्रण दिल", अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.