Breaking News Saam tv
महाराष्ट्र

Sangli Breaking News: पंचशील नगरात सिलेंडरचा स्फाेट; भीषण आगीत ४ घरे जळून खाक

या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

विजय पाटील

सांगली : पंचशील नगर (sangli panchshil nagar) येथे गॅस सिलेंडरचा स्फाेट झाला आहे. यामुळे येथे माेठ्या प्रमाणात आग पसरली आहे. या आगीत सुमारे चार घरे जळून खाक झालीत. या घटनेत एक अग्निशमन विभागाच्या जवानासह, नागरिक जखमी झाले आहेत. (sangli latest marathi news)

दुपारच्या सुमारास चारही घरातील सर्व कुटुंब बाहेर गेले होते. यावेळी अचानक एका पत्र्याच्या घरातून धूर येऊ लागला. त्यामुळे नागरिकांनी लगेच अग्निशमन विभागास कळविले.

या घटनेची (fire) माहिती मिळताच अग्निशमन विभाग तातडीने घटनास्थळी (sangli) पाेहचले. सध्या येथे आग विझविणयाचे काम सुरु असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान आग आटोक्यात आणत असताना घरातील एका सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे अग्नीशनम विभागाचा एक कर्मचारी आणि नागरिक जखमी झाले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चारही घरातील सर्व संसार उपयोगी सामान जळून खाक झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tadgola Benefits : ताडगोळे फळ कधी खाल्ले आहे का? चमत्कारी फायदे वाचाल तर आताच खरेदी कराल

Maharashtra Live News Update : आखाती युद्धाचा परिणाम, मनमाड शहरात एकमेव असलेला गोगॅस पंप झाला ड्राय

Kidney failure symptoms: पाठदुखी हे पहिलं लक्षण नाही; किडनी फेल होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा अडचणीत; मावळच्या शेतकऱ्याने खेचलं कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Politics: २५-३० आमदारांसह राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार; राऊतांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT