Sangli: जतमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन आजी माजी आमदारांमध्ये जुंपली

लोकवर्गणीतून १६ लाखाहून अधिक रुपये खर्चून तयार केलेला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे.
Sangli News
Sangli Newsविजय पाटील
Published On

सांगली - जत शहरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये चबुतरा बसवून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा बसण्यावरून आजी आणि माजी आमदार यांच्या मध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे जत शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जत-सांगली (Sangli) रस्त्यावरील छत्रपती शिवाजी चौकात १९६२ साली तत्कालीन जत संस्थानिक डफळे यांनी छत्रपतींचा पुतळा बसविला होता. परंतु सोळा वर्षापुर्वी एका वाहनाच्या धडकेत चबुतरास तडा गेल्याने हा पुतळा काढण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी लोकवर्गणीतून नवा अश्वारूढ पुतळा बसविणे व जीर्णोद्धार करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेते व शिवप्रेमीने घेतला होता. (Sangli Latest News)

हा पुतळा तयार झाल्याने तो यावर्षीच्या शिवजयंतीला १९ फेब्रुवारी बसवण्यात यावा अशी लोकभावना आहे. त्यानुसार समितीचे अध्यक्ष विलासराव जगताप यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा मिरजेतून शनिवारी पोलिसांनी अटकाव करूनही जत शहरात आणला आहे. लोकवर्गणीतून १६ लाखाहून अधिक रुपये खर्चून तयार केलेला छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बसण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. 

हे देखील पहा -

माजी आमदार जगताप यांनी आम्ही जुन्याच पुतळ्याचा जीर्णोद्धार करून पुतळा बसवत असताना प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली प्रशासकीय आडकाठी आणत आहे. असा थेट आरोप करत जिल्हाधिकारी, राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

तर आमदार विक्रम सावंत यांनी जगताप यांच्या सर्व आरोप खोटे आहेत. आम्ही महाराच्या पुतळ्याच्या आडून कोणतेच राजकारण करत नाही. आम्ही उलट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवलं पाहिजे यासाठी आग्रही आहे. पण जगताप हे गलिच्छ राजकारण करत आहेत. पुतल्यावरून स्वतःची राजकीय पुनर्वसन करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.

Sangli News
"मुख्यमंत्री साहेब चुका होतात फक्त जनतेला सांगा की..."

तर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संबंधित विभागाची परवानगी घेतल्याशिवाय पुतळा बसवता येणार नाही असा आदेश दिला आहे. त्यानंतर पुन्हा वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून शहरात वातावरण तंग बनले आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शहरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहराला छावणीचे स्वरूप आले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com