Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime: गॅरेज कामगाराची हातपाय बांधून हत्या; पत्नी पसार

दाेन ते तीन दिवसांपूर्वी ही हत्या झाल्याचा अंदाज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक - वडाळा गावातील गजबजलेल्या माळीगल्लीत गॅरेज कामगाराची हातपाय बांधून धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना रात्री उघडकीस आली. गेल्या दाेन ते तीन दिवसांपूर्वी ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून घरातून दुर्गंधी येत असल्याने ही धक्कादायक घटना समाेर आली आहे. दरम्यान, या घटनेत हत्या झालेल्या कामगाराची पत्नी पसार झाली आहे. (Nashik Crime News)

दिलीप रंगनाथ कदम(वय 51, रा. माळीगल्ली, वडाळागाव, नाशिक) असे मृताचे नाव आहे. तर त्याची पत्नी लक्ष्मी कदम (42, मूळ रा. येवला, जि. नाशिक)हिचा शाेध पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. पाेलिसांच्या (Police) माहितीनुसार कदम कुटुंब माळीगल्लीत वास्तव्यास आहे. त्यातील दिलीप हे पंचवटीतील गणेशवाडीत गॅरेज मॅकेनिक असून त्यांना राेशन हा मुलगा आहे.

शनिवारी दिलीप यांच्या घरातून उग्र वास येत हाेता. शेजारी राहणाऱ्या लोकांनी याबाबद पोलिसांना माहिती दिली. पाेलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घराची पाहणी करताच दिलीप यांचा मृतदेह दाेरीने हातपाय बांधून पाेटावर वार केलेल्या अवस्थेत आढळला. दिलीप यांची दुसरी पत्नी लक्ष्मी ही पसार असून तिने तिच्या साथीदारांसह ही हत्या केली का याचा शोध आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार तिचा येवला व अन्य भागात शाेध घेतला जात आहे.दरम्यान या बाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कराडमध्ये

TDP workers : मुख्यमंत्र्यांबद्दलचं ते विधान भोवलं, माजी मंत्र्यांच्या घरावर हल्ला, तोडफोडीनंतर जमावाने लावली आग

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? अर्थसंकल्पात काय घोषणा झाली? वाचा सविस्तर

Tulsi Mala Niyam: तुळशीची माळ परिधान करण्याचे नियम काय आहेत? योग्य पद्धत आणि धार्मिक अर्थ जाणून घ्या

Sushila Recipe : नाश्त्याला बनवा मराठवाड्याचा चविष्ट पदार्थ 'सुशीला', १० मिनिटांत रेसिपी तयार

SCROLL FOR NEXT