Gadchiroli: नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणारी टोळी अटक Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli: नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवठा करणारी टोळी अटक

नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्याचा पुरवठा करणारी नक्षल समर्थक टोळीला अटक करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गडचिरोली: नक्षलवाद्यांना (Naxals) स्फोटक साहित्याचा पुरवठा करणारी नक्षल समर्थक टोळीला अटक (arrested) करण्यात आली आहे. या नक्षल समर्थकांकडून नक्षल साहित्य आढळून आले आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी या प्रकरणी ४ जणांना अटक (arrested) करण्यात आली आहे. यामध्ये एक जण फरार आहे. गडचिरोलीमधील (Gadchiroli) जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील उपपोस्टे दामरचा हद्दीतील मौजा भंगारामपेठा गावात या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे. (Gang supplying explosives to Naxals arrested Gadchiroli)

हे देखील पहा-

दामरंचा पोस्टे पार्टी आणि शीघ्र कृती दल (क्युआरटी) दामरंचाचे जवान नक्षलविरोधी (Naxals) अभियान राबवित होते. त्यावेळी तेलंगणामधून (Telangana) दामरंचा मार्गे छत्तीसगड (Chhattisgarh) या ठिकाणी वाहतूक करत असलेल्या ४ इसमांकडून १० नग कार्डेक्स वायरचे बंडल आणि इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात यश आले आहे.

यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी या प्रकरणात राजू गोपाल सल्ला (वय-३१) करीमनगर (तेलंगणा), काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे (वय-२४) अहेरी-गडचिरोली, साधू लच्चा तलांडी (वय- ३०), मोहम्मद कासिम शादुल्ला, करीमनगर (तेलंगणा) या ४ अटक करण्यात आली आहे. तर, छोटू ऊर्फ सिनू मुल्ला गावडे हा आरोपी मौजा भंगाराम पेठा अहेरी येथील रहिवासी असून तो फरार आहे. गडचिरोली पोलिसांकडून याचा सध्या शोध सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari: जुई गडकरीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहून सौंदर्याचं कौतुक

Indian Railway: आता मोठं बिऱ्हाड ट्रेननं नेता येणार नाही; विमान प्रवासाचा नियम रेल्वेमध्ये होणार लागू, वाचा काय आहे कारण

Maharashtra Rain Live News : - भर पावसात कृषिमंत्री दत्ता भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर

Swara Bhaskar : मला डिंपल यादववर क्रश आहे, सगळे bisexual आहोत; स्वरा भास्करचं वक्तव्य, VIDEO

Loksabha: मुख्यमंत्री असो पंतप्रधान खुर्ची जाणारच; लोकसभेत सादर होणार विधेयक काय आहे, काय होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT