सोलापूरात दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

सोलापूरात दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

सोलापूर, लातूर आणि औसा या शहरातून दुचाकी चोरणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. दहा मोटरसायकली यामध्ये जप्त करण्यात आलेल्या आहेत.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : जिल्हात अनेक ठिकाणी वाहन चोरीच्या घटना घडत असतानाच सोलापूर, लातूर आणि औसा या शहरातून दुचाकी चोरणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. दहा मोटरसायकली यामध्ये जप्त करण्यात आलेल्या आहेत. अमित थोरात, पांडुरंग पांचाळ, मनोज राठोड, बालाजी लोंढे या चौघांना अटक करण्यात आलेले आहे. सोलापुरातील जोडभावी पेठ, फौजदार चावडी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यातील तीन दुचाकी तर लातूर, औसा येथील सात दुचाकी असे एकूण दहा दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. (gang of two wheeler thief is arrested in solapur)

हे देखील पहा -

३ ऑगस्ट रोजी मोहन जाधव यांची दुचाकी रुपा भवानी मंदिराजवळ चोरीला गेली होती. जुना तुळजापूर नाक्याजवळ फौजदार प्रविण दांडे आणि त्यांच पथक गस्त घालत असताना एक विना क्रमांकाची दुचाकी जात होती. संशय आल्याने त्याचा पाठलाग करून डी मार्ट जवळ त्यांना पोलिसांनी पकडले. थोरात आणि पांचाळ यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी लातूर जिल्ह्यातून ही दुचाकी सोडल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे आणखी साथीदार मनोज राठोड आणि बालाजी लोंढे यांनाही ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेरबंद करण्यात आलेले सर्वजण रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. मौजमजा करणे, दुचाकी विक्रीच्या पैशातून मद्यपान, जेवण करणे हा त्यांचा मनोरंजनाचा भाग आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

SCROLL FOR NEXT