Kolhapur Ganeshotsav 2023, Ganpati Festival 2023, Ganesh Festival 2023 saam tv
महाराष्ट्र

Ganeshotsav 2023 : शिंदे-ठाकरे गटाच्या वादाची गणेशाेत्सवावर झालर, बिंदू चाैकात माेठा पाेलीस बंदाेबस्त; काय घडतयं नेमकं काेल्हापूरात?

हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत देखील गेला हाेता.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Ganpati Utsav : सर्वत्र गणेशोत्सव आनंदात साजरा केला जात असतानाच काेल्हापूरात मात्र राजकीय वादाची चादर उत्सवावर पडल्याचे चित्र आहे. शिंदे- ठाकरे गटाचा वादात काेल्हापूरातील एका गणेशाेत्सव मंडळात एकाच मंडपात दाेन गणपती बाप्पा विराजमान हाेण्याची चिन्ह निर्माण झाले आहे. (Maharashtra News)

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी महत्त्वाचे असे दोन २ गणपती (ganeshotsav) विराजमान होतात. त्यातील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यातून शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता देखील निर्माण झाल्याने पाेलीसांचा परिसरात माेठा बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे.

वादाचे कारण हे शिंदे आणि ठाकरे गट असल्याची जाेरदार चर्चा आहे. गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यावरून दाेन्ही गटात वाद निर्माण झाला आहे. हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत देखील गेला.

त्यानंतर मांडवात २१ फुटी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेत आज त्याच मंडपात अजून एका गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्धार केला आहे.

बिंदू चौकात माेठा पाेलीस बंदाेबस्त

त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. ठाकरे गट त्यांचा बाप्पा घेऊन बिंदू चौकातून छत्रपती शिवाजी चौकाकडे जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बिंदू चौक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT