Godavari Express Ganeshotsav saam tv
महाराष्ट्र

Ganpati Onboard Godavari Express : गोदावरी एक्सप्रेसमध्ये बाप्पा विराजमान, सर्वधर्मीय भाविकांची दर्शनास झुंबड

ganesh chaturthi 2023 : आमचा प्रवास सुखरुप होऊ दे, प्रवासात कुठलेही विघ्न येऊ देऊ नको अशी प्रार्थना भाविक करीत गेली अनेक वर्ष प्रवास करीत आहे.

Siddharth Latkar

- अजय साेनवणे

Nashik Ganpati Utsav : देवा हाे देवा गणपती देवा..., तू सुखकर्ता... असे विविध सूर आज प्रवाशांच्या कानी पडत हाेते अन् प्रवासी भक्तीभावाने आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेत हाेते. गेल्या 27 वर्षांपासून असलेली परंपरा मनमाड- मुंबई प्रवास करणाऱ्यांनी आजही गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करुन जाेपासली. (Maharashtra News)

दररोज असंख्य प्रवाशांची सेवा करणा-या गाेदावारी एक्सप्रेसमधील गणेशोत्सवाची (Godavari Express) ख्याती आता राज्यभर पसरली आहे. त्यामुळे या रेल्वे गाडीने दहा दिवस प्रवास करण्यासाठी देशातील अनेक गणेशभक्त आतूर असतात. यंदा देखील गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणेशाेत्सवाचा उत्साह दिसून येत आहे.

या गाडीच्या एका बोगीत सर्वधर्मीयांच्या माध्यमातून रात्री आर्कषक फुलांची सजावट करण्यात आली. आज मनमाड स्थानक आणि परिसर बाप्पामय होऊन गेला आहे. रेल्वेत बाप्पांचा गजर करत दररोजचा प्रवास सुखाचा व्हावा अशी अनेकांनी प्रार्थना केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात

T20 World Cup 2026: टीम इंडिया सुपर ८ मधून बाहेर होणार? रन रेटनं वाढवलं टेन्शन

Thyroid Disease Symptoms: अचानक जास्त थंडी वाजतेय? सावध व्हा, थायरॉईडच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Ladki Bahin Yojana: जानेवारीचा हप्ता खात्यात जमा, पण या लाडकींना ₹१५०० मिळणार नाहीत

Good News: विदर्भासाठी आनंदाची बातमी! पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार, फडणवीस सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT