महाराष्ट्रात गणेश विसर्जनादरम्यान तिघांचा मृत्यू
नांदेडमध्ये दोघांचा तर नंदुरबारमध्ये एका तरुणांचा मृत्यू
नांदेडच्या काळेश्वर येथे गोदावरी नदीत बुडून दोन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा मृत्यू
नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात धरणातील बुडून २६ तरुणाचा मृत्यू
लाडक्या गणरायाला निरोप देताना महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नांदेडमध्ये गणरायाचे विसर्जन करताना इंडिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर नंदुरबारमध्ये विसर्जन करताना २६ वर्षीय तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झाला. ३ तरुणांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
नांदेड शहरातील काळेश्वर येथे गोदावरी नदीत बुडून २ तरुणांचा मृत्यू झाला. गणेश विसर्जनासाठी हे तरुण तिथे गेले होते. पोहण्यासाठी ते नदीत उतरले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. दोन्ही तरुण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. देगलूर तालुक्यातील किनी येथील १९ वर्षीय बजरंग येडूरे आणि मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील २० वर्षीय दीपक सोळूंखे अशी मृत तरुणाची नावे आहेत.
नांदेड शहराजवळच्या वाडी पाटी येथील मातोश्री प्रतिष्ठान महाविद्यालय येथे हे दोन्ही तरुण इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. रविवारी ते आपल्या मित्रांसोबत गणरायाला निरोप देण्यासाठी आले होते. गणरायाच्या विसर्जनासाठी काळेश्वर येथे गोदावरी नदीत ते पोहण्यासाठी उतरले खरे पण पुन्हा बाहेर आले नाहीत. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. दोघांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात गणेशोत्सवाला गालबोट लागले. गणेश विसर्जनासाठी गेलेल्या २६ वर्षीय तरुणाचा धरणातील पाण्याच्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. प्रताप जिऱ्या पावरा असे मृत तरुणाचे नाव होते. तो मेडिकल कॉलेजमध्ये मानधनावर कक्ष सेवक म्हणून कार्यरत होता.
प्रताप गणेश मंडळासोबत कोठार येथील धरणावर गणरायाच्या विसर्जनासाठी गेला असता ही घटना घडली. पाण्यात बुडाल्यानंतर तरुणाला तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.