Ganesh Chaturthi 2023 Saam tv
महाराष्ट्र

Ganesh Chaturthi 2023 : सोनं पावलांनी आले बाप्पा...,सांगलीत 'चोर' गणपतीची प्रतिष्ठापना; २०० वर्षांची परंपरा

Chor Ganapti Story : पंचायतन संस्थाच्या गणेशाची प्रतिपजेला म्हणजेच चतुर्थाच्या चार दिवसांआधी प्रतिष्ठापना केली जाते.

कोमल दामुद्रे

Sanagli Chor Ganpati :

लाडक्या गणरायाचे आगमन काही दिवसात घरोघरी होणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्शी साजरी केली जाते. महाराष्ट्रातील विविध भागात श्रीगणेशाची मूर्ती स्थापन केली जाते. त्यातील एक सांगली.

सांगलीचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या श्रीगणेश मंदिरामध्ये चोर गणपतीची पाहाटे प्रतिष्ठापना झाली आहे. चोर पावलांनी येणारा गणपती सांगलीत प्रसिद्ध आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणाऱ्या या चोर गणपतीची २०० वर्षांची परंपरा आहे.

पंचायतन संस्थाच्या गणेशाची प्रतिपजेला म्हणजेच चतुर्थाच्या चार दिवसांआधी प्रतिष्ठापना केली जाते. तसेच चोर गणपती (Ganesh) कधी आला आणि गेला याविषयी भाविकांना माहित नसते. या विघ्नहर्ताला चोर गणपती म्हणण्याची प्रथा रुढ झाल्याची आख्यायिका (Story) देखील आहे.

१८४४ पासून सुरु झालेला संस्थान गणेशोत्सव आजही तेवढ्याच थाटामाटात श्रीगणेशाची पूजा करते. भाद्रपद महिन्यातील प्रतिपदेला मंदिरातील (Temple) गाभाऱ्यात दोन्ही बाजूस चोर गणपती विधीपूर्वक बसवला जातो. त्यानंतर पंचमीपर्यंत विविध कार्यक्रमांनी उत्सव साजरा करण्यात येतो. या दिवशी संपूर्ण मंदिर झगमगून जाते.

1. चोर गणपतीची आख्यायिका

गणेश चतुर्थीच्या आधी चोर गणपतीची प्रतिष्ठापना होते. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना मंदिराच्या गाभाऱ्यात करण्यात येते. दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी त्याच दोन मूर्तींची मंदिरात स्थापना केली जाते. तसेच रंगरंगोटीशिवाय गणपतीमध्ये कोणताही बदल केला जात नाही. मंदिरातील गणरायाच्या मुख्य मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही मूर्ती बसवण्यात येतात. तसेच गणेशोत्सव संपल्यानंतर मूर्ती सुरक्षितस्थळी देखील ठेवण्यात येते. याबाबतची संबंधित माहिती तेथील पुजारी आणि भाविकांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

SCROLL FOR NEXT