school, latur saam tv
महाराष्ट्र

Minor Girl : वयात आलेली मुलगी शाळेतून घरी परतलीच नाही, चाैकशीत पालकांना बसला माेठा धक्का

ही घटना लातूर शहरात घडली आहे.

दीपक क्षीरसागर

सकाळी स्कूल व्हॅनमधून शाळेत गेलेली मुलगी घरी न परतल्याने पालकांनी गांधी चाैक पाेलिस ठाणे गाठले. लातूर (latur) पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुलीचा तपास सुरु केले आहे. तसेच अज्ञाता विराेधात गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना लातूर शहरात घडली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मुलीच्या भावाने तक्रारीत त्याची बहिण सकाळी स्कूल व्हॅनने शाळेत गेली. मात्र नंतर घरी परत आलीच नाही. व्हॅनचालकाशी संपर्क केला असता त्याने ती शाळेतच आली नसल्याचे सांगितले.

या घटनेबाबत शाळेतील (school) शिक्षकांकडे (teacher) विचारणा केली असता सकाळच्या मध्यंतरामध्ये तिने शिक्षकांच्या मोबाईलवरून एक फोन केला हाेता. भावाला बोलावून घेतले आहे असे सांगून त्याच्यासोबत ती निघून गेली असल्याचे सांगितले.

सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र ती कुठेच सापडली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेले म्हणून पोलिसांनी (police) गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

SCROLL FOR NEXT