gajendra singh shekhawat , sharad pawar saam tv
महाराष्ट्र

Pandharpur : नीरा देवघरचा प्रकल्प शरद पवारांमुळेच रखडला, त्यांनीच पाणी पळवले : गजेंद्र सिंह शेखावत

आज शेखावत हे पंढपूरात आले आहेत.

भारत नागणे

Pandharpur : नीरा देवघरचे (Nira Deoghar) पाणी शरद पवारांनी (sharad pawar) पळवले अशी टीका केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (gajendra singh shekhawat) यांनी आज पंढरपूरात केली. दरम्यान महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी लवकरच एक सर्वंकष आराखडा जल शक्ती मंत्रालय करेल असा विश्वास शेखावत यांनी व्यक्त केला आहे. पंढरपूरात (pandharpur) माध्यमांशी बाेलताना शेखावत यांनी आगामी काळातील निरा देवघरबाबतच्या नियाेजनाची माहिती दिली. त्यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) उपस्थित हाेते.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेची केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत व माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आज हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. आता कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला गती मिळेल अशी आशा आहे.

या योजने संदर्भात अलीकडेच खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी जलशक्ती विभागाचे मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेऊन निधीची मागणी केली होती. त्यावेळी गजेंद्रसिंह सेखावती यांनी या भागाचा दौरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज गजेंद्रसिंह शेखावत यांनी या भागाची पाहणी केली. आज दुपारी पंढरपुरात या संदर्भात एक बैठक देखील आयोजित केली आहे.

पंढरपूरात माध्यमांशी बाेलताना जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले मागच्या दोन वर्षात राज्यातील सरकारमुळे अनेक प्रकल्प रखडले. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे नाव घेता दाेन्ही नेत्यांवर शेखावत यांनी टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुष्काळी भागात पाणी आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता त्यासाठी अधिकचा निधी मिळेल. महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी लवकरच एक सर्वंकष आराखडा जल शक्ती मंत्रालय करेल अशी माहिती शेखावत यांनी दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT