Gadchiroli Elephants
Gadchiroli Elephants संजय तुमराम
महाराष्ट्र

Chandrapur Elephants: महाराष्ट्रातील 13 हत्ती गुजरातमध्ये नेण्यास गडचिरोलीकरांचा विरोध

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर: महाराष्ट्रातील 13 हत्ती गुजरातच्या जामनगरमध्ये नेण्यास विरोध केला जातोय. गडचिरोली जिल्ह्यातील 7 तर चंद्रपूरच्या ताडोबा प्रकल्पातील 6 अशा एकूण 13 हत्तींचा यात समावेश आहे. राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण व केंद्रीय वन व पर्यावरण बदल मंत्रालयाने हा प्रस्ताव दिला होता. (Gadchirolikars oppose taking 13 elephants from Maharashtra to Gujarat)

हे देखील पहा -

महाराष्ट्रातील (Maharashtra) 13 हत्ती गुजरातच्या जामनगरमध्ये (Jamnagar, Gujrat)) नेण्यास विरोध होतोय. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली, सिरोंचा आणि चंद्रपूरच्या ताडोबा प्रकल्पातील एकूण 13 हत्तींचा (Elephants) यात समावेश आहे. राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण (National Zoological Authority) व केंद्रीय वन व पर्यावरण बदल मंत्रालयाने (Union Ministry of Forests and Environmental Change) हा प्रस्ताव दिला होता. राज्य सरकारने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. यासाठीचे परिवहन नियोजन पूर्ण झाले असून तीन टप्प्यात हे 13 हत्ती जामनगरच्या एका खाजगी समूहाद्वारे संचालित 250 एकरातील प्राणिसंग्रहालयात पाठविले जाणार आहेत. जामनगर येथील राधेकृष्ण मंदीर हत्ती कल्याण ट्रस्ट हत्ती परिवहनाचे काम दोन्ही राज्ये आणि केंद्रीय वनमंत्रालय तज्ज्ञांच्या देखरेखीत करणार आहे.

या 13 हत्तींमध्ये ताडोबा प्रकल्पात 4 नर, 2 मादी आणि आलापल्ली वनविभाग 2 नर, 1 मादी तर सिरोंचा वनविभाग (कमलापूर कॅम्प) येथे 1 नर, 3 मादी यांचा समावेश आहे. वनविभागाची लाकूड वहनाची कामे करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे हे हत्ती कॅम्प आहे. ते आता पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. जिल्हा व राज्यातून हजारो पर्यटक हत्तींचा मुक्तसंचार अनुभवण्यासाठी कमलापूर येथे येत असतात. कमलापूर येथे वनविभागाच्या अखत्यारीतील हत्तींना गुजरातेत पाठवण्यास आता विरोध सुरू झालाय. कमलापूरातील सुविधा वाढवून हा कॅम्प सुयोग्य पर्यटन स्थळ करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

गेली काही वर्षे ताडोबातील हत्ती बिथरण्याच्या घटना पुढे आल्या होत्या. त्यामुळे हत्ती सफारी थांबविण्यात आली. तर आलापल्ली येथे लाकूड वहनासाठी यंत्र आणि ट्रक्सचा वापर वाढल्याने या हत्तींवरील देखरेख खर्च मोठा मुद्दा झाला होता. राज्याच्या वनविभागाने यावर उपाय शोधण्याऐवजी हत्ती स्थलांतराला मान्यता दिल्याने गडचिरोलीकर संतापले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: बारामतीसह ११ लोकसभा मतदारसंघात आज होणार मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

SCROLL FOR NEXT