Gadchiroli ST Bus  Saam TV
महाराष्ट्र

Gadchiroli Bus Viral Video : ड्रायव्हर जोरात, बस कोमात; छप्पर उडालेल्या 'लाल परी'चा व्हिडीओ व्हायरल, संबंधित अधिकारी निलंबित

VIral Video : गडचिरोलीतील अहेरी आगारची अतिशय खराब अवस्थेत ही बस रस्त्यावरून धावताना दिसत आहे.

साम टिव्ही ब्युरो

मंगेश भांडेकर

Gadchiroli News : गडचिरोलीमधील एका एसटी बसचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्यातील एसटी बसची चिंताजनक स्थिती या व्हिडीओतून दिसत आहे. व्हिडिओमध्ये एसटी महामंडळाच्या बसचं छप्पर उडताना दिसत आहे. गडचिरोलीतील अहेरी आगारची अतिशय खराब अवस्थेत ही बस रस्त्यावरून धावताना दिसत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही अनेकांकडून उपस्थित केला जात होता.

एसटी महामंडळाच्या अनेक बस जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गडचिरोलीच्या रस्त्यावरून भरधाव धावणाऱ्या लाल परीचं छत एका बाजूने हवेत उडताना दिसत आहे. (Viral News)

बसचे छत हवेत डोलत असतानाही बस वेगाने धावत आहे. अशातच अर्धे लटकलेले हे छत उडून गेल्यास जीवितहानी होण्याचीही दाट शक्यता होती. सुदैवाने काहीही झाले नाही. मात्र सुदैवाने हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि एसटी महामंडळाला जाग आली. (Latest Marathi News)

अभियंता निलंबित

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एसटी महामंडळाने या प्रकरणी संबंधित अभियंत्याला निलंबित केले आहे. बसचे काम वेळेत पूर्ण न करणे, बस त्रुटींसह वाहतुकीसाठी उपलब्ध करुण दिल्याचा ठपका अभियंत्यावर ठेवण्यात आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन बसेस मार्गस्थ कराव्यात असे निर्देशही आगार व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local News : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! रेल्वे प्रवास होणार सुसाट, पश्चिम रेल्वेने १५ ठिकाणी वेगमर्यादा हटवली

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे देवगोई घाटात कोसडली दरड

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला पूजा करताना करा 'या' मंत्राचा जप, सर्व अडचणी दूर होतील

Liqour Ban : दारूबंदी विरोधात महिलांचा एल्गार; शेड- हातगाड्यांची केली तोडफोड

Shocking: घरात पूजा ठेवली, पिरियड्स थांबवण्यासाठी गोळ्या खाल्ल्या, १८ वर्षांच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT