Gadchiroli Mulchera News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : धक्कादायक! वरिष्ठाकडून सतत शरीर सुखाची मागणी, वैतागून परिचारिकेची आत्महत्या, गडचिरोलीतील अधिकार्‍यावर कारवाई

Gadchiroli Mulchera Officer Doctor Suspended : गडचिरोलीतील मुलचेरा तालुक्यात वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याच्या अश्लील मागणीला कंटाळून कंत्राटी परिचारिकेने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. पीडितेवर उपचार सुरू असून आरोपी डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याला निलंबित करण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याच्या अश्लील मागणीमुळे परिचारिकेने विष प्राशन केले

  • पीडित महिलेवर ICU मध्ये उपचार सुरु

  • आरोपी डॉक्टरवर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला निलंबित केले

  • व्हॉट्सअप चॅटचे अश्लील स्क्रीनशॉट्स समोर येताच आरोग्य विभागात खळबळ

गडचिरोलीतील मुलचेरा तालुक्यातील उपकेंद्रात कार्यरत असलेल्या एका ४५ वर्षीय कंत्राटी परिचारिकेने वरिष्ठ अधिकाऱ्याकडून होत असलेल्या सततच्या शरीर सुखाच्या मागणीला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या पीडित परिचारिकेवर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर पीडित महिलेच्या जबाबावरून सोमवारी उशिरा गडचिरोली पोलिसानी झीरो एफआयआर दाखल करत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद म्हाशाखेत्रीवर (Doctor Vinod Mhashakhetri ) गुन्ह्या दाखल केला. शिवाय आता या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला तालुक्यातील एका आरोग्य उपकेंद्रात कंत्राटी परिचारिका म्हणून कार्यरत आहे. त्यांची दोन वर्षापासून वेतनवाढ थांबवण्यात आली होती. वेतनवाढीसाठी पीडित महिला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना व्हाट्सअप मॅसेजवरून संपर्क करायच्या. मात्र तालुका आरोग्य अधिकाऱ्याने मेसेजद्वारे शरीर सुखाची मागणी केली. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने परिचारिका कर्तव्य पार पाडल्यानंतर घरी गेली. ती प्रचंड तणावात होती. रात्री जेवण करून पतीचा डोळा चुकवून तिने विषारी द्रव प्राशन केले.

पतीच्या ही गोष्ट लक्षात आल्याने पतीने तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर महिलेला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणातील अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स समोर आल्यानंतर आरोग्य विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.परिचारिकेच्या पतीने संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यावर पैसे नको, मला तूच पाहिजेस, असा कथित घृणास्पद दबाव टाकल्याचा थेट आरोप केला असून संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी पीडितेच्या पतीने केली आहे.

दरम्यान या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली असून त्याला आज निलंबित करण्यात आले असून तो अद्याप फरार असल्याचे वृत्त आहे. या अधिकाऱ्याला काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या घटनेनंतर आरोग्यव्यवस्था खडबडून जागी झाली असून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: सरकारी नोकरीची संधी! सैनिक कल्याण विभागात भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? वाचा

Thick And Natural Eyebrows Tips: जाड आयब्रोज हवेत? मग पार्लरला जाण्यापूर्वी 'या' 5 घरगुती टिप्स नक्की ट्राय करा; ७ दिवसांत दिसेल मोठा फरक!

Maharashtra Live News Update: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये; पत्रकार परिषद घेणार

Ikkis OTT Release : धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार?

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे ११,४०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

SCROLL FOR NEXT