Gadchiroli Viral Video  Saam Tv
महाराष्ट्र

Viral Video : बायकोला चार्जर दिला नाही, तरुण संतापला; रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण

Gadchiroli Viral Video: गडचिरोलीच्या आरमोरी शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीला मारहाण करतानाची घटना रेस्टॉरंटमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Priya More

मंगेश भांडेकर, गडचिरोली

बायकोला मोबाइलचा चार्जर न दिल्याचा राग आल्याने एका तरुणाने रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण केली आहे. गडचिरोलीच्या आरमोरी शहरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीला मारहाण करतानाची घटना रेस्टॉरंटमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीच्या आरमोरी शहरातील वडसा टी पाईंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सोहेल शेख नावाचा तरुण आपल्या पत्नीसोबत नाश्ता करण्यासाठी या टी पॉईंटमध्ये आला होता. कामानिमित्त तो बाहेर निघून गेला. त्याच्या पत्नीने रेस्टॉरंटच्या काऊंटवर असलेल्या तरुणीला चार्जर मागितला. तरुणीने चार्जर द्यायला नकार दिला ही बाब या महिलेने आपल्या पतीला सांगितली.

आपल्या बायकोला तरुणीने मोबाइलचा चार्जर दिला नाही त्यामुळे तरुण संतापला. त्याने १९ वर्षीय तरुणीला बेदम मारहाण केली. यावेळी या तरुणाने आपल्या मित्रांना देखील बोलावले. तरुणाच्या मित्रांनी देखील तरुणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मुलीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी सोहेल शेख आणि अयुब शेख या दोघांवर गुन्हा दाखल केला असला तरी अटक केलेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर गोलंदाज IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT