Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी आता यापुढेही नोंदणी करता येणार, पण.... शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी सांगितली महत्वाची अपडेट

Gadchiroli News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरवात करत प्रत्येक महिलेला दार महिन्याला १५०० रुपये घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती

Rajesh Sonwane

मंगेश भांडेकर 
गडचिरोली
: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अजून देखील महिला योजनेसाठी नोंदणी करत आहेत. आता नोंदणी करणाऱ्या महिलांना देखील याचा लाभ मिळणार असून या मिळणारी रक्कम ही कमी मिळणार असल्याची मोठी अपडेट समोर आली असून शिंदे गटातील मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरवात करत प्रत्येक महिलेला दार महिन्याला १५०० रुपये घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती. ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ एकत्रित जमा झाले आहे. योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्याने उर्वरित महिलांनी देखील नोंदणी करण्यास सुरवात केली आहे. मात्र यापुढे नोंदणी करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ (Aditi Tatkare) मिळणार आहे. 

ज्या महिन्यात नोंदणी त्याच महिन्याचा लाभ 

१ सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाही. तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गडचिरोली (Gadchiroli) येथे दिली. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच राहणार आहे. मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून त्या महिलेला लाभ मिळेल. आतापर्यंत ७० ते ७५ टक्के महिलांची नोंदणी झाली असल्याची माहितीही मंत्री तटकरे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT