Gadchiroli Bus Service Saam tv
महाराष्ट्र

Bus Service : स्वातंत्र्यानंतर गडचिरोलीच्या १५ गावांमध्ये बस सेवा; गावकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी केला प्रवास

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात काही महिन्यांपूर्वी गर्देवाडापर्यंत बस जात होती पुढे छत्तीसगड सीमेच्या दिशेने अनेक किमीपर्यंत महाराष्ट्राच्या भागात पक्के रस्ते नव्हते

Rajesh Sonwane

पराग ढोबळे 

नागपूर/ गडचिरोली : देशाला स्वतंत्र मिळून ७५ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र आजही अनेक गावांमध्ये बससेवा सुरु झालेली नाही. अशाप्रकारे गडचिरोली जिल्ह्यातील गर्देवाडा ते वांगेतुरी या दरम्यानच्या सुमारे १५ गावांना स्वात्रंत्र्याच्या साडेसात दशकांनंतर बससेवा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांसोबत प्रवास केला. 

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात काही महिन्यांपूर्वीपर्यंत फक्त गर्देवाडा पर्यंतच बस जात होती. कारण पुढे छत्तीसगड सीमेच्या दिशेने अनेक किलोमीटर पर्यंत महाराष्ट्राच्या भागात पक्के रस्ते आणि पुलच नव्हते. यामुळे बससेवा सुरु करण्यात अडचणी येत होत्या. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बससेवेचे उद्घाटन केल्यानंतर स्वतः एसटी बसमधून गावकऱ्यांसोबत प्रवास केला. तसेच माओवाद्यांच्या बालेकिल्लातील प्रवास करत नक्षलग्रस्त भाग भीतीमुक्त होत असल्याचा संदेश दिला.

३२ किमीचा रस्ता केला तयार 

गडचिरोली जिल्ह्याच्या भागात माओवाद्यांचा नक्षलगिरी चालत होती. मात्र दोन वर्षांपूर्वी गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात आपला डॉमिनन्स वाढवण सुरू केलं. एकानंतर एक पोलीस मदत केंद्रांची उभारणी झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही हिम्मत करत गट्टा ते वांगेतुरी दरम्यान ३२ किलोमीटरचा रस्ता निर्माण केला. यामुळे आज स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गर्देवाडाच्या पुढे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेपर्यंत म्हणजेच वांगेतुरीपर्यंत बस सेवा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्याच्या बसमधून प्रवास 
तब्बल स्वातंत्र्याचा ७५ वर्षानंतर दुर्गम भागात बस उपलब्ध झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बस सेवेला हिरवी झेंडी दाखवत बससेवेचा शुभारंभ केला. तसेच स्वतः या बसमध्ये काही अंतरापर्यंत प्रवास करत गडचिरोली जिल्ह्यात बदल, नवीन रुप आणि नक्षलीना एक संदेश देण्याचे काम आजच्या दौऱ्यातून केल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT