Gadchiroli Zp School Saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli Zp School : धक्कादायक वास्तव.. गडचिरोलीतील ८४ जिल्हा परिषद शाळा शिक्षकाविना; शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक नसल्याने पालक विद्यार्थ्यांनी अनेकदा आंदोलन केली आहेत.

Rajesh Sonwane

मंगेश भांडेकर 
गडचिरोली
: राज्यातील जिल्हा परिषद शाळांची बिकट अवस्था झालेली आहे. या शाळांना अगोदरच विद्यार्थी मिळत नसल्याने शाळा सुरु ठेवण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. तर दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ८४ जिल्हा परिषद शाळा शिक्षकाविना असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. 

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक नसल्याने पालक विद्यार्थ्यांनी अनेकदा आंदोलन केली आहेत. शिक्षक मिळावे या मागणीसाठी अनेकदा गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकत आंदोलन केले आहे. मात्र शासनाकडून रिक्त पदे भरली जात नसल्यामुळे जिल्ह्यातील देसाईगंज तालुका वगळता इतर ११ तालुक्यातील तब्बल ८४ शाळा शिक्षकाविना आहेत. याबाबत (Zp School) जिल्हा परिषद प्रशासन देखील उदासीन असल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

दरम्यान गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून (Education department) अद्याप समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. शैक्षणिक सत्र सुरू होऊन देखील या शाळा शिक्षकाविना आहेत. गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, भामरागड तालुक्यातील प्रत्येकी एक तर कोरची १०, धानोरा, मुलचेरा दोन, चामोर्शी ५ एटापली ३५, अहेरी ७ आणि सिरोंच्या तालुक्यातील तब्बल १९ शाळा शिक्षकाविना आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asha Bhosle Funeral: आशा भोसले यांच्या आठवणींनी भारावला सचिन तेंडुलकर, अंत्यदर्शनावेळी अश्रू अनावर

Marathi Actress Photoshoot: डोक्यावर टोपी आणि डोळ्याला गॉगल, मराठमोळ्या अभिनेत्रीचं समुद्रकिनारी हटके फोटोशूट

Maharashtra News Live Update: दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवून देण्याचा ईमेल

HSRP Number Plate: वाहनधारकांनो, हे काम आताच करा, अन्यथा बुधवारपासून PUC मिळणार नाही, HSRP बाबत महत्त्वाची अपडेट

Blood Pressure Risk: हे फळ खाल्लं तर BPचा त्रास वाढणार, आत्ताच व्हा सावध; डॉक्टरांचा सल्ला वाचाच

SCROLL FOR NEXT