Gadchiroli News Saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli News : १११ वर्षाच्या आजी व्हीलचेअरवर पोहचल्या केंद्रावर; मतदान करत बजावला हक्क

Gadchiroli News : चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हील चेअरची व्यवस्था केली होती.

साम टिव्ही ब्युरो

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानासाठी काही ठिकाणी मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडले आहेत. तर काही मतदारसंघात मतदारांचा निरुत्साह पाहण्यास मिळत आहे. मात्र लोकशाहीच्या या उत्सवात १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले आहे.

गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी फुलमती बिनोद सरकार (वय १११) असे मतदान करणाऱ्या आजींचे नाव आहे. फुलमती सरकार यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजी झाला. त्यांना चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हील चेअरची व्यवस्था केली होती. आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला.

निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली होती. त्या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया सुद्धा राबविण्यात आली. मात्र फुलमती सरकार या वृद्ध आजीने मतदान केंद्रावरच जाऊन प्रत्यक्ष मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आज प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. मतदान केल्यानंतर आपल्या भाषेत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले.

शाल- श्रीफळ देऊन स्वागत
मतदान करण्यासाठी फुलमती सरकार या आजीला प्रशासनाने चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणले. त्यानंतर शालेय विद्यार्थी, गावकरी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पांचा वर्षाव करत मतदान केंद्राच्या आवारात स्वागत केले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रशासनाच्या वतीने अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती सरकार यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamin B12: व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे महिलांमध्ये जाणवतात 'ही' ४ लक्षणे, जाणून घ्या

Maharashtra Exit Poll : महायुतीला 152 ते 160 जागांवर मिळणार? चाणक्य स्ट्रॅटेजीच्या एक्झिट पोलची आकडेवारी

Palghar Tourism: पालघरमधील 'या' प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या

Maharashtra exit Poll : महाराष्ट्रात पुन्हा महायुतीच! 'पोल'च्या झटक्यानं मविआची 'एक्झिट'

Maharashtra Exit Poll : सरस कोण, शरद पवारांची राष्ट्रवादी की अजित पवारांची? आश्चर्याचा धक्का देणारी एक्झिट पोलची आकडेवारी

SCROLL FOR NEXT