गडचिरोली : रस्ते बांधकामावर असलेल्या 11 वाहनांची नक्षल्यांकडून जाळपोळ SaamTvNews
महाराष्ट्र

गडचिरोली : रस्ते बांधकामावर असलेल्या 11 वाहनांची नक्षल्यांकडून जाळपोळ

गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांना नक्षल्यांचा असणारा विरोध स्पष्टपणे पुढे आलाय.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांना नक्षल्यांचा असणारा विरोध स्पष्टपणे पुढे आलाय. रस्ते बांधकामावर असलेल्या 11 वाहनांची नक्षल्यांकडून जाळपोळ करण्यात आली आहे. यात 9 ट्रॅक्टर, 2 जेसीबीचा समावेश आहे. भामरागड (Bhamragad) तालुक्यातील इरपनार गावाजवळ दुपारी ही घटना घडली.

हे देखील पहा :

ह्या भागातील धोडराज-इरपनार-नेलगुंडा गावांना जोडणाऱ्या रस्ता (Road) निर्मितीचे काम सुरू होते. या कामावर यंत्रसामुग्री कार्यरत असताना नक्षल्यांनी काम थांबवून वाहनांची जाळपोळ केली. अतिदुर्गम भागात विकासकामांना नक्षल्यांचा (Naxals) विरोध जारीच आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेत नक्षल शोधमोहीम वेगवान केली आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणूक आणि मतमोजणी पूर्ण होऊन 24 तास होत नाही तोच नक्षली सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Serum : नासलेले दूध फेकून देताय? थांबा! हिवाळ्यात बनवा 'असा' फेस सीरम, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

Railway Jobs: रेल्वेत १,२०,५७९ पदांसाठी भरती; मागच्या ११ वर्षात लाखो पदे भरली; वाचा सविस्तर

नॅशनल हायवेवर भीषण अपघात; भरधाव डंपरची बसला धडक, १० जणांचा जागीच मृत्यू, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Suraj Chavan Wife Emotional: सासरी जाताना भावाच्या गळ्यात पडून रडली संजना, सुरजच्या बायकोचा भावनिक व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT