GADCHIROLI FAKE CURRENCY RACKET BUSTED ATM ALERT LEADS TO FOUR ARRESTS Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

Gadchiroli News : गडचिरोलीत एटीएममध्ये बनावट नोटा जमा करण्याच्या प्रयत्नातून मोठा रॅकेट उघडकीस आला. नागपूरपर्यंत पोहोचलेल्या या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • गडचिरोलीत एटीएममुळे बनावट नोटांचा रॅकेट उघड

  • नागपूरपर्यंत पसरलेले जाळे उघडकीस

  • चार आरोपी अटकेत, दोन इंजिनिअर भावंडांचा समावेश

  • पोलिसांकडून बनावट नोटा आणि साहित्य जप्त

गणेश शिंगाडे, गडचिरोली

गडचिरोली शहरात बनावट नोटांचा मोठा रॅकेट उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. एटीएममध्ये बनावट नोटा जमा करण्याच्या प्रयत्नातून हा प्रकार समोर आला असून, या प्रकरणाची पाळेमुळे थेट नागपूरपर्यंत पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन इंजिनिअर भावंडांसह एकूण चार जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी कारगिल चौक परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये १०० रुपयांच्या २१ बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, एटीएम मशीनने या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्याने संशय निर्माण झाला. बँक प्रशासनाने तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.

तपासादरम्यान पोलिसांनी प्रमोद कोवे आणि आदित्य रेचनकर यांना ताब्यात घेतले. चौकशीतून या प्रकरणाचे धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचले. त्यानुसार १६ मेच्या मध्यरात्री नागपूरमध्ये छापा टाकण्यात आला. या कारवाईत मयूर आणि आदित्य डोईजड या इंजिनिअर भावांना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या फ्लॅटची झडती घेतली असता, ५०, १०० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटा, प्रिंटर तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.

या सर्व मुद्देमालाची किंमत सुमारे ३९,७०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. या आरोपींनी बनावट नोटा छापून त्या एटीएमच्या माध्यमातून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांनी याआधी किती बनावट नोटा बाजारात चलनात आणल्या आहेत, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे.

या प्रकरणाबाबत सहायक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी माहिती देताना सांगितले की, “ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असून, यामागे आणखी कोणी आहे का, याचा शोध घेतला जात आहे.” दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Bride Ritual : आषाढ महिन्यात नवविवाहितेला माहेरी का पाठवतात? काय आहे परंपरा

Maharashtra News Live Update: तुकाराम मुंडे यांची धडक मोहीम! आता उल्हासनगरातही FDA ची कारवाई

PM Suraksha Bima Yojana : मोदी सरकारची खास योजना; फक्त २० रुपयांत मिळतो २ लाख रुपयांचा विम्याचा लाभ, जाणून घ्या संपूर्ण माहिती

वर्किंग वूमनसाठी बेस्ट इयररिंग्स; वेस्टर्न टू एथनिक दोन्ही कपड्यांवर दिसतील भारी

Tharala Tar Mag: 'ठरलं तर मग'मध्ये सायलीच्या डोहाळ्यांसाठी अर्जुनची धावपळ; पण एका चुकीमुळे बाळावर ओढावणार मोठं संकट?

SCROLL FOR NEXT