Gadchiroli Crime News Saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli Crime News: एसआरपीफ जवनाकडून सहकाऱ्याचीच हत्या; कचरा टाकण्यावरून वाद

एसआरपीफ जवनाकडून सहकाऱ्याचीच हत्या; कचरा टाकण्यावरून वाद

साम टिव्ही ब्युरो

गडचिरोली : कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून राज्य राखीव बलाच्या जवानाने शेजारी राहणाऱ्या सहकाऱ्याची चाकू भोसकून हत्या केली. ही घटना (Gadchiroli) गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यातील विसोरा येथील (SRPF) राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ मुख्यालय परिसरात आज उघडकीस आली. (Breaking Marathi News)

सुरेश मोतीलाल राठोड असे हत्या झालेल्या जवानाचे नाव असून आरोपी जवान मारोती सातपुते याला अटक करण्यात आली आहे. दोघेही जवान यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. विसोरा येथे राज्य राखीव बल गट क्रमांक १३ चे जिल्हा मुख्यालय आहे. या परिसरातील वसाहतीत सुरेश राठोड आणि मारोती सातपुते शेजारी वास्तव्यास होते. मागील काही दिवसांपासून दोघांच्याही कुटुंबात कचरा टाकण्यावरून आणि इतर कारणावरून वाद सुरू होते.

रात्रीच्‍या सुमारास वाद विकोपाला

दरम्‍यान सोमवारी रात्री ११ वाजताच्या (Crime News) सुमारास दोघांमधील वाद विकोपाला गेला. आरोपी मारोती याने घरातून चाकू आणून सुरेशवर वार केले. यात सुरेशचा मृत्यू झाला. याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT