Gadchiroli News  Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli News: गडचिरोलीत पोलीस अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक, २ नक्षलवादी ठार; एक तास सुरू होता गोळीबार

Police Vs Naxalites: गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तब्बल १ तास गोळीबार सुरू होता. यामध्ये दोघा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास पोलिसांना यश आले.

Gangappa Pujari

मंगेश भांडेकर, गडचिरोली| ता. १४ डिसेंबर २०२३

Gadchiroli News:

गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यात ही घटना घडली. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये तब्बल १ तास गोळीबार सुरू होता. यामध्ये दोघा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास पोलिसांना यश आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्तीसगड (Chhattisgarh) सीमेवर नक्षलवाद्यांचा एक मोठा तुकडी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे परिसरात शोधमोहीम राबवण्यासाठी पोलीस दल परिसरात शोध घेत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.

नक्षलवाद्यांच्या या गोळीबाराला पोलीस दलाने प्रत्युत्तर दिले. यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जवळपास एक तास गोळीबार सुरू होता. या गोळीबारानंतर परिसरात झडती घेतल्याने एक AK47 आणि एक SLR शस्त्र घेऊन दोन पुरुष नक्षलवादी मृतदेह सापडले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कर)

मृत्यू झालेल्या दोघांपैकी एकाची प्राथमिक ओळख म्हणजे कसनसूर दलमचा उप कमांडर दुर्गेश वट्टी. दुर्गैश वट्टी हा 2019 मध्ये जांभूळखेडा स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता. या भीषण स्फोटात गडचिरोली पोलिसांचे 15 पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. दरम्यान, या चकमकीनंतर पुढील ऑपरेशन्स आणि परिसराचा शोध सुरू आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

SCROLL FOR NEXT