गडचिरोली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात ११ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणाचा कुटुंबियांचा आरोप
दोन तासांपूर्वीपर्यंत चिमुकली ठणठणीत असल्याचा दावा
घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची नागरिकांची मागणी
Gadchiroli 11 Month Old Baby Death Medical Negligence गडचिरोली मधील जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथील बालरोग विभागात डॉक्टरांच्या कथित निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर मुलीचे नाव वंशिका साजन लेनगुरे असे आहे. वांशिकाच्या निधनानंतर तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंशिकावर गडचिरोली मधील जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथील बालरोग विभागात उपचार सुरू होते. उपचार सुरु असताना ती सुमारे दोन तासांपूर्वीपर्यंत ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र अचानक तिची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे दोन तासांपूर्वीपर्यंत ठणठणीत असलेली वंशिका अचानक कशी काय दगावली? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गडचिरोली हा आदिवासी व दुर्गम जिल्हा असून येथील गरीब नागरिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयांवर अवलंबून असतात.
मात्र डॉक्टरांची कमतरता, अपुरी वैद्यकीय साधनसामग्री, तसेच काही ठिकाणी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची निष्काळजी वृत्ती यामुळे रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार मिळत नाहीत. यामुळे गरीब व सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान वंशिकाच्या निधनानंतर तिच्या आईसह कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.