विजय पाटील / विश्वभूषण लिमये
नव्या हिट अँड रन कायद्याच्या (New Hit And Run Law) विराेधात राज्यभरात ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपामुळे (truck driver strike) इंधन पूरवठ्यावर परिणाम हाेऊ शकताे या भीतीने बहुतांश जिल्ह्यातील पेट्राेल पंपावर नागरिकांनी वाहनांसह रांगला लावल्या हाेत्या. दरम्यान सांगलीत (sangli) इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून साेलापूरात (solapur) जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थितीनंतर सुरळीत इंधन पूरवठा हाेणार असल्याचे चित्र आहे. (Maharashtra News)
सांगली शहरातील काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्याचे चित्र आहे. दरम्यान काही पंपावर अत्यल्प पेट्रोल साठा आहे. मार्केट यार्ड मधील पेट्रोल पंपातील पेट्रोल संपल्याचे सांगितले गेले. दुसरीकडे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल पंप चालक, वाहतूकदार आणि इतर संघटनांमध्ये बैठक सुरू आहे.
या बैठकीत ड्रायव्हरच्या संप आणि जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील साठ्या बाबतची चर्चा हाेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण या ठिकाणी मिरजहून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जात असतो.
जिल्हाधिका-यांच्या शिष्टाईने सोलापूरातील पेच सुटला
सोलापूर जिल्ह्यातील इंधन वाहतूकदार आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर वाहतूक सुरु झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तीनही कंपन्यातील इंधन वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
70 टक्के वाहन चालक ट्रक घेऊन इंधन वितरणासाठी रवाना झालेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शिष्टाईने सोलापुरातील वाहन चालकांचा विरोध मावळला आहे. सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होणार नसल्याचे प्रशासनाकडून आश्वासित करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.