Solapur murder news, friend kills friend Saam TV News
महाराष्ट्र

Crime : आईसोबत अनैतिक संबंध, मित्रानेच मित्राचा काटा काढला, मृतदेह शेतात पुरला, सोलापुरातील धक्कादायक घटना

Shocking Solapur Murder: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात मित्रानेच मित्राचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याची खळबळजनक घटना. आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हा खून झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur murder news, friend kills friend : आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला अन् मित्रानेच मित्राचा काटा काढला. मित्राचा खून करून मृतदेह शेतात पुरला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सौंदणे गावात ही धक्कादायक खुनाची घटना उघडकीस आली आहे. मित्राच्या चारित्र्यावर संशय घेऊन विकास मारुती गुरव याने आपला मित्र नेताजी तानाजी नामदे याचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याची खळबळजनक घटना समोर आली. ही घटना २४ ते २८ मे २०२५ दरम्यान घडली. मोहोळ पोलिसांनी आरोपी विकास गुरव याला अटक केली आहे.

नेताजी नामदे हा दळण आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. मात्र, तो परत न आल्याने त्याचे वडील तानाजी नामदेव यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, नेताजीच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅप माहितीच्या आधारे तपासाला गती मिळाली. वडिलांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार, पोलिसांनी विकास गुरव याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, विकासने नेताजीने त्याच्या आईसोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या संशयातून खून केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासने नेताजीचा खून करून त्याचा मृतदेह शेतात पुरला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणात विकास गुरव याला २ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना सौंदणे गावात आणि मोहोळ तालुक्यात चर्चेचा विषय बनली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणातील इतर बारीकसारीक तपशील उघड होण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी या क्रूर कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT