Train Derailed: Saam Tv
महाराष्ट्र

Train Derailed: पूर्णा येथे मालगाडीचे इंजिन रुळावरून घसरले; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Train Derailed: मालगाडीचे दोन इंजिन रेल्वे रुळावरुन घसरल्याची घटना घडलीय.

Bharat Jadhav

Train Derailed:

पूर्णा येथून अकोलाकडे जाणार्‍या एका मालगाडीचे दोन इंजिन रेल्वे रुळावरुन घसरले. सुदैवाने यात कोणतीच जीवितहानी झाली नाही. पूर्णा रेल्वे स्थानकापासून जवळच मैल क्रं ५३ बी १/१२ येथे रेल्वे रुळावरून रेल्वेचे दोन इंजिन अचानक घसरले. हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच चालकाने या घटनेची माहिती पूर्णा रेल्वे स्टेशन मास्तर यांना दिली. घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी आणि सी.एन.डब्ल्यू विभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. (Latest News)

मालगाडीचे इंजिन रूळावरून घसल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे जयपूर हैदराबाद,पंढरपूर एक्सप्रेस व नांदेडहून मुंबईला जाणाऱ्या देवगिरी,नंदीग्राम एक्सप्रेसला विलंब लागला. दरम्यान गाडीला पूर्ववत रुळावर आणण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेल्वे चालकाला इंजिन रुळावरून घसरल्याचे कळाले, तेव्हा त्यांनी स्टेशन मास्तरला याची माहिती दिली. त्यानंतर स्टेशन मास्तरने ताबडतोब रेल्वे स्थानकावर असलेले आपात्कालीन सायरन वाजवले. त्यानंतर घटनास्थळी सी.एन.डब्ल्यू विभागाचे अधिकारी जी.दिपक कुमार, सचिन वाघमारे अजयकुमार पंढरपुरे, सुरज शेंडगे, महेंद्र ठाकूर आदीं कर्मचारी तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे अमित झा, स्टेशन मास्तर राजू भिसे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच रेल्वे लाईनचेही नुकसान झाले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

जमिनीच्या व्यवहारांवर ITची नजर; 2 लाखांवरील रोखीचे व्यवहार रडारवर

डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप

मामाच्या मुलीशी लग्नावर बंदी येणार? नातेवाइकांमधील विवाह रोखण्यासाठी नवा कायदा?

SCROLL FOR NEXT