Puri- Ahmedabad Express
Puri- Ahmedabad ExpressSaam tv

Puri- Ahmedabad Express: पुरी एक्सप्रेसमधून अडीच लाखांचा गांजा जप्त; भंडारा रोड रेल्वे पोलिसांची कारवाई

Bhandara News : पुरी एक्सप्रेसमधून अडीच लाखांचा गांजा जप्त; भंडारा रोड रेल्वे पोलिसांची कारवाई
Published on

शुभम देशमुख 

भंडारा : रेल्वेतून प्रवास करताना काही सामान नेण्यास बंदी आहे. अशात पुरी- अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये (Bhandara) दोन बॅगमध्ये गांजा लपवून नेणाऱ्या दोन तस्करास रेल्वे पोलिसांनी (Railway Police) अटक केली. त्यांच्या जवळून २ लक्ष ५१ हजार ५०० रुपयाचा गांजा जप्त करण्यात आला. (Tajya Batmya)

Puri- Ahmedabad Express
Amravati News: कारागृहात गांजा, गुटख्याचे चेंडू; अमरावतीतील धक्कादायक प्रकार

शाबीर अतिक हुसैन (वय २५, रा. गोमतीपुरा अहमदाबाद), मनिषा बहाद्दुरसिंह नेपाली (वय २०, चपरा अहमदाबाद) असे अटक झालेल्या आरोपीचे नावे आहेत. हे दोघे पुरी- अहमदाबाद (Railway) या रेल्वेत (गाडी क्र. १२८४३) मध्ये मोठ्या हुशारीने गांजाची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती भंडारा रोड रेल्वे पोलिसांना मिळाली. स्टेशनमध्ये गाडी थांबताच पोलिसांनी प्रत्येक डब्यात प्रवेश करून गाडी तपासणीला सुरुवात केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Puri- Ahmedabad Express
Jalgaon News : पत्नीसह तिन्ही मुले तीन महिन्यांपासुन बेपत्ता; तणावातून गृहस्थाचे टोकाचे पाऊल

तपासणी दरम्यान गाडीच्या बी ३ डब्ब्यात सीट १४ नंबरच्या खाली दोन संशयित बॅग आढळल्या. त्या बाहेर काढून तपासणी करण्यात आली. त्यामधून गांजा आढळून आला. दोन्ही बॅग उघडल्या असता २ बॅगमध्ये ४ पैकेट ठेवण्यात आले होते. यात एकूण २५ किलो १५ ग्राम गांजा दिसून आला.  ज्याची बाजारभाव १० हजार प्रति किलो प्रमाणे २ लाख ५१ हजार ५०० रुपये आहे. कारवाई करीत जप्त केलेले साहित्य व नमुने गोंदिया रेल्वे पोलिसांना पाठविण्यात आले. आरोपीवर एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com