पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे मोफत धान्य आणखी तीन महिने मुदतवाढ- सुधाकर श्रंगारे दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे मोफत धान्य आणखी तीन महिने मुदतवाढ- सुधाकर श्रंगारे

लोकांची मागणी अजूनही असल्याने लोकांचा विचार करून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला आणखी ३ महिने मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : कोरोना काळात कोणताही गरीब वर्ग उपाशी राहू नये, यासाठी प्रत्येकाला ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ आणि ५ किलो डाळ मोफत देण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे, ही योजना नोव्हेंबर महिन्यात संपणार होती. मात्र लोकांची मागणी अजूनही असल्याने लोकांचा विचार करून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला आणखी ३ महिने मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिली आहे.

हे देखील पहा-

लातुरातील नवीन एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या मैदानात आयोजित आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय खाद्य निगमच्या वतीने करण्यात आले होते. यासोबतच देशातील कुपोषण संपविण्यासाठी नव्या फोर्टिफाईड तांदळाची निर्मिती करण्यात आली आहे.

या तांदळात विटामिन बी १ ते बी १२ पर्यंत विटामिन आहेत. सध्या हा तांदूळ फक्त अंगणवाडयांना वितरित केला जाणार आहे. २०२४ पर्यंत हा तांदूळ सर्वांसाठी उपलब्ध होणार असल्याचे देखील यावेळी भारतीय खाद्य निगमच्या वतीने सांगण्यात आल्याची माहिती सुधाकर शृंगारे यांनी यावेळी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसाने गणपती मंडळाची लोखंडी कमान भररस्त्यात कोसळली

5 Breakfast Recipe: 5 मिनिटांत बनवा 5 झटपट आणि चविष्ट नाश्त्याचे प्रकार

Sharad Pawar: पवारांचं टायमिंग कुणालाच कळत नाही; शरद पवारांच्या विधानावर तटकरेंची प्रतिक्रिया व्हायरल

करदात्यांसाठी सर्वात मोठी बातमी! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढली; पाहा नवी अंतिम तारीख

Google Search: गुगलवर चुकूनही या 5 गोष्टी सर्च करू नका, महागात पडेल

SCROLL FOR NEXT