डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - Saam TV
महाराष्ट्र

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १२० कोटींचा घोटाळा

येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात १२० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आलं आहे.

साम टिव्ही

(रश्मी पुराणिक/डाॅ. माधव सावरगावे)

औरंगाबाद : येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्या कार्यकाळात १२० कोटींचा गैरव्यवहार (Fraud) झाल्याचे समोर आलं आहे. Aurangabad hundred crore fraud in Dr Babasaheb Ambedkar Marathwada University

२०१७ या वर्षामध्ये तत्कालीन कुलगुरू (Vice Chancellor) बी.ए. चोपडे यांच्या काळात विविध निविदा, खरेदी आणि कंत्राट (Contract) चुकीच्या पद्धतीने देऊन कोट्यवधीचा घोटाळा (Fraud) झाल्याच्या तक्रारीवरून विधिमंडळ आश्वासन समितीच्या वतीने चौकशी करण्यात आली. या चौकशीत विद्यापीठामध्ये १२० कोटींचा घोटाळा झाल्याचं दिसून आले.

विद्यापीठात निविदा प्रक्रिया न राबवता आपल्या जवळच्या कॉन्ट्रॅक्टरकडून खरेदी करणे, विद्यार्थी संख्येपेक्षा दोन पटीने अधिक प्रश्नपत्रिकांची छपाई करणे, विद्यापीठाअंतर्गत संलग्न असलेल्या महाविद्यालयाकडून मिळणाऱ्या शुल्काची नोंद न ठेवणे, ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रश्नपत्रिकेसाठी गरजेपेक्षा जास्त खर्च करणे, प्रश्नपत्रिका छपाई पेक्षा वितरणासाठी अधिक खर्च करणे अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये घोटाळा झाला असल्याचे चौकशी समितीच्या निष्कर्षात समोर आले आहे.

यातील जवळपास ६७ कोटी रुपयांचा थेट अपहार झाल्याचं अहवालातील निष्कर्षानुसार दिसून येतंय. तर जवळपास ६० कोटी रुपयांच्या नोंदींची फेरफार केल्याचं दिसून येतंय. औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भ्रष्टाचाराची चौकशीसाठी सरकारने समिती नेमली होती 2017 साली सरकारला अहवाल प्राप्त झाला. मात्र अद्यापही यावर कारवाई झाली नव्हती.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

Chanakya Niti: वैवाहिक जीवन क्षणार्धात होईल उद्ध्वस्त; बायकोने 'या' 3 गोष्टी नवऱ्यापासून नेहमी लपवूनच ठेवाव्यात

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Jalgaon : अंगावर काटा आणणारी घटना! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Chief Minister Salary : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो?

SCROLL FOR NEXT