प्रवासात अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्याने App डाऊनलोड केला आणि फसला, काही क्षणात दीड लाखांना फटका Saam TV
महाराष्ट्र

प्रवासात अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्याने App डाऊनलोड केला आणि फसला, काही क्षणात दीड लाखांना फटका

मोबाईलवर SMS व कॉल करून ॲप डाऊनलोड करायला सांगून OTP विचारत, १ लाख ४१ हजारांची फसवणूक केली.

दिपक क्षीरसागर

लातुर : मोबाईलवर SMS व कॉल करून ॲप डाऊनलोड करायला सांगून OTP हस्तगत करून १ लाख ४१ हजारांची फसवणूक झाल्याची घटना साकोळ ते शिरूर अनंतपाळ रोडवर प्रवासादरम्यान घडली आहे. याबाबत अज्ञात आरोपीविरुद्ध लातुर जिल्ह्यातील (Latur District) शिरूर अनंतपाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील टिपराळ येथील अरुण गुणवंतराव बिरादार हे साकोळ ते शिरूर अनंतपाळ रोडवर प्रवास करत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याचा मोबाईल (Mobile) नंबर ६३७०१५४५०७ या नंबरहून फिर्यादीच्या ७४०६६३४७८६ यावर एसएमएस व कॉल करून App डाऊनलोड करण्यास सांगितले.

अॅप डाऊनलोड करतेवेळेस दहा रुपयांचे रिचार्ज करण्यास सांगितले. त्यानंतर ओटीपी नंबर हस्तगत करून फिर्यादीच्या संमतीशिवाय १ लाख ४१ हजार रुपये काढून फिर्यादीची फसवणूक केली, अशी तक्रार अरुण गुणवंतराव बिरादार यांनी शिरूर अनंतपाळ पोलिसात दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध कलम ४२० भादंविसह कलम ६६ (डी) आयटी अॅक्टनुसार शिरूर अनंतपाळ पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, कोणत्याही अनोळखी व्यक्तीने आपणास फोन करुन OTP कींवा आधारकार्ड नंबर विचेरले असता त्याना कोणतीही माहिती देवू नका असं पोलिस प्रशासनाकडून वारंवार सांगूनही नागरिक अशा फोन कॉल्सना बळी पडतात आणि आपली फसवणूक करुन घेतात ही गंभीर बाब असून आता याबाबत सर्वांनी सतर्कता बाळगायला हवी.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT