Accident news saam tv
महाराष्ट्र

Solapur: भीषण अपघातात चार भाविकांचा मृत्यू, १९ जखमी; कदमवाडीवर शाेककळा

सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक अरूण फुगे हे पुढील तपास करीत आहेत.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : एकादशीसाठी तुळजापूरहून (tuljapur) पंढरपूरला (Pandharpur) निघालेल्या भाविकांच्या ट्रक्टर आणि मालमोटार यांच्या झालेल्या अपघातात (accident) चार भाविक ठार झाले असून १९ जण जखमी झाले आहेत. त्यातील ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर सोलापूरजवळ (solapur) कोंडी येथे रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. (solapur accident latest news)

या अपघातात तुकाराम सुदाम शिंदे, भागाबाई जरासंद मिसाळ, जरासंद माधव मिसाळ, ज्ञानेश्वर दत्तात्रय साळुंखे (सर्व राहणार कदमवाडी तालुका तुळजापूर) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामधील जखमींना सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना शासकीय रूग्णालयात अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (tejaswi satpute) यांनी शासकीय रूग्णालयात धाव घेतली. घटनास्थळीही जाऊन त्यांनी अपघाताचे निरीक्षण नोंदविले. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक अरूण फुगे हे पुढील तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी

Sindhudurg Beach : रुपेरी वाळू अन् निळेशार पाणी! सिंधुदुर्गातील 'या' सुंदर समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य पाहून वेडे व्हाल

Kanda Methi Bhaji Recipe: चहासोबत खाण्यासाठी झटपट बनवा टेस्टी कुरकुरीत कांदा-मेथी भजी; वाचा सोपी रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा; होणारी बायको कोण? हिऱ्याच्या अंगठीने वेधलं लक्ष, पाहा PHOTO

Accident News : भीषण अपघात! चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक; २ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT