Wardha Crime Saam TV
महाराष्ट्र

वर्धेत चार अल्पवयी मुलं बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

सेलू तालुक्यातील मसाळा येथील घटना दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास, वर्धा

वर्धा - जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील मसाळा येथील चार अल्पवयीन मुले अचानक बेपत्ता झाली आहे. मुले बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ माजली असून सेलू पोलिसांनी (Police) अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी पोलिसांकडून वेगवेगळे पथक स्थापन करून तपास केला जातं आहे.पप्पू देवढे वय 13 वर्ष, राज येदानी वय 13 वर्ष, राजेंद्र येदानी वय 12 वर्ष, संदीप भुरानी वय 8 वर्ष अशी बेपत्ता मुलांची नाव आहे.

शनिवारी मसाळा येथील पप्पू देवढे या मुलाला शाळेतून सकाळी 11 वाजता त्यांच्या वडिलांनी घरी आणून ते शेतात निघून गेले. त्यानंतर कामावरून सायंकाळी पाच वाजता दरम्यान घरी आले तेव्हा त्यांना मुलगा घरी दिसला नाहीय. त्यांनी गावात आणी नातेवाईकांकडे शोध घेतला असता गावातील त्याचे आणखी तीन मित्र बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. प्रकरणी पप्पूच्या वडिलांनी सेलू पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहे.

मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच सेलू पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय. जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक स्वतः वेगवेगळे पथक स्थापन करून मुलांचा शोध घेतला जातं आहे. तसेच जिल्हा सीमांवर नाकाबंदी करून तपासणी केल्या जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिनाभर रिकाम्या पोटी प्या 1 चमचा नारळाचे तेल; शरीरात होतील 'हे' 5 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update : संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन,पोलिसांकडून नेत्याची धरपकड

Maharashtra Politics: अजित पवार गटाला भाजपचा 'दे धक्का'; माजी खासदार सोडणार राष्ट्रवादीची साथ

Cancer : रोजच्या आहारातील 'या' पदार्थांमुळे वाढतो कॅन्सरचा धोका, अति प्रमाणात खात असाल तर सावधान

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विश्वासू नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार प्रवेश

SCROLL FOR NEXT