four injured in car and auto rickshaw accident at savangi phata karanja darwha road saam tv
महाराष्ट्र

Washim Accident News : सावंगी फाटानजीक कार ऑटोचा अपघात, चार प्रवासी जखमी

कारंजाहुन धामणगाव देव येथे जवळपास ७ ते ८ प्रवासी घेऊन प्रवासी ऑटो निघाली हाेती. त्याचवेळी या मार्गावर समोरून येणाऱ्या कारची व प्रवासी ऑटोची धडक झाली.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim :

वाशिम जिल्ह्यातील कारंजा - दारव्हा मार्गावरील सावंगी फाट्याजवळ आज (शनिवार) प्रवासी ऑटो व कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ऑटोमधील चार जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले आहे. (Maharashtra News)

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी - कारंजाहुन धामणगाव देव येथे जवळपास ७ ते ८ प्रवासी घेऊन प्रवासी ऑटो निघाली हाेती. त्याचवेळी या मार्गावर समोरून येणाऱ्या कारची व प्रवासी ऑटोची धडक झाली.

या घटनेत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारंजा येथील रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी अपघाताची माहिती देताच रुग्णवाहिका चालकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बोदेगाव व लोही येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. पाेलिस अपघाताचा तपास करीत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इंदापूरला खडकवासला कालव्याचे पाणी न मिळाल्याने शेतकरी संतप्त

कोरियन मुलींसारखा चेहरा हवाय? पार्लरला जाऊ नका, या ५ सोप्या पद्धतीने घरीच मिळवा 'कोरियन ग्लास स्किन

Assam Assembly: विधानसभेत 'यूनिफॉर्म सिविल कोड विधेयक सादर; आतापर्यंत किती राज्यात लागू झालाय UCC कायदा?

Thyroid disorder: सतत बेचैनी आणि हृदयाची धडधड वाढतेय? डॉक्टरांनी सांगितली थायरॉईडच्या कॅन्सरची धोकादायक लक्षणं

Pune : पुण्यातील संतापजनक घटना; बस स्टँडवर तरूणीसमोर हस्तमैथून, पोलिसांनी ४८ तासांत नराधमाच्या मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT