थर्टी फर्स्ट ची पार्टी पडली महागात; चार मित्रांनी केला मित्राचाच खून!  SaamTVnews
महाराष्ट्र

थर्टी फर्स्ट ची पार्टी पडली महागात; चार मित्रांनी केला मित्राचाच खून!

थर्टी फर्स्ट ची पार्टी एका तरुणाच्या जिवावर बेतल्याची घटना नांदेड मध्ये घडलीय.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड : थर्टी फर्स्ट ची पार्टी एका तरुणाच्या जिवावर बेतल्याची घटना नांदेड मध्ये घडलीय. शहरातील गोदावरी नगर येथील बि. आर. जे. प्लाझा या अपार्टमेंट मध्ये 31 डिसेंबर रोजी थर्टी फर्स्ट ची पार्टी करण्यासाठी पाच मित्र जमले. हि पार्टी सुरु असताना मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले.

हे देखील पहा :

या पाच जणांपैकी एकाने संतोष भालेराव या तरुणास जबर मारहाण केली. जखमी झालेला संतोष इमारतीच्या चौथा मजल्याच्या गॅलरीतून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी घटनास्थळावर भेट देऊन, संतोष ला मारहाण करणाऱ्या चार जणांना तातडीने ताब्यात घेतले.

या गुन्ह्याप्रकरणी संतोष भालेराव याची पत्नी श्वेताने दिलेल्या तक्रारीवरून सोपान पाटील, गणेश कदम, माधव बोळके, मारोती बोरलेपवाड या चार आरोपींविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT