Beed Farmer News Saam Tv
महाराष्ट्र

दुर्दैवी! बीड जिल्ह्यात एकाच दिवशी चार शेतकऱ्यांची आत्महत्या

या चारपैकी ३ जण तरुण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

विनोद जिरे

बीड: बीड (Beed) जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्याचं धक्कादायक आणि विदारक चित्र समोर आले आहे. गेल्या २४ तासात बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यामध्ये तीन शेतकऱ्यांनी (Farmer) गळफास घेऊन आत्महत्या केली, तर एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

चंद्रकांत भारत जाधव वय २८ रा. उमरद खालसा ता.बीड, या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तर दुसरी आत्महत्येची घटना बीड तालुक्यातीलच मुर्शदपूर या ठिकाणी घडली. येथील परशुराम तुकाराम जगताप वय ३८ यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिसरी घटना गेवराई तालुक्यातील मादळमोही या ठिकाणी घडली. भीमा बाबू काटमोरे यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर चौथी घटना माजलगाव तालुक्यात घडली. रमेश नागुराव कोंबडे वय ३० या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

या चारही आत्महत्या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये प्रथमदर्शनी आकस्मिक मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली असून, आत्महत्या का केली ? याचा तपास सुरू आहे.

बीड जिल्ह्यात गतवर्षी २१० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

दरम्यान, बीड (Beed) जिल्ह्यात गतवर्षी २१० शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते. तर यंदा मात्र या आत्महत्येच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात कर्जबाजारीपणा, नापीकी, अतिवृष्टी यासह विविध कारणांमुळे नैराश्यात आलेल्या शेतकऱ्यांसह इतरांच्या आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तर गेल्या २४ तासात तब्बल चार जणांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून, या चारपैकी ३ जण तरुण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

Maharashtra Rain Live News: खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग; पुण्यातील टिळक पूल वाहतुकीसाठी बंद

Parliament: अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल, लोकसभेत नेमकं काय घडलं?

Online Gaming Ban Bill : ऑनलाइन गेम खेळणं बंद होणार? केंद्राचं विधेयक, ऑनलाईन गेम 'ओव्हर'

SCROLL FOR NEXT