Nandurbar News  saam tv
महाराष्ट्र

Crime News : मुलीच्या धाडसामुळे कुटुंबावरील मोठे संकट टळले, ४ सशस्त्र दरोडेखोरांना अटक

अंधाराचा फायदा घेत पळुन गेलेल्याचा पाेलीस शाेध घेताहेत.

Siddharth Latkar

- सागर निकवडे

Nandurbar Crime News : नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडीत एका व्यापाऱ्याचा घरात मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न झाला. केवळ मुलीच्या सर्तकतेमुळे भरवस्तीत मोठ्या सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न असफल ठरला. या घटनेतील ४ सशस्त्र दरोडेखोरांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे कुंभार गल्लीत भरवस्तीत असलेल्या एका व्यापारी यांच्या घरात मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. पाच दरोडेखोर अग्रवाल दांपत्याला दोराने बांधून मारहाण करीत होते.

त्याचा आवाज आल्याने मुलीला जाग आली. ते दृश्य पाहून घाबरून न जाता घराबाहेर गेली नातेवाईकांना कळवले. त्यांनी पोलीसांना घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता पोलीसांनी धाव घेत चार जणांना ताब्यात घेतले तर एक जण घटनास्थळावरुन निसटला.

त्या फरार दरोडेखोरास शोधण्यासाठी पोलीसांनी व सतर्क नागरिकांनी सर्वत्र परिसर पिंजून शोधाशोध सुरू केली. अंधाराचा फायदा घेत ताे पळुन जाण्यास यशस्वी झाला होता. पोलीस (police) त्याचा शोध घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT