Mallikarjun Kharge  Saam Tv
महाराष्ट्र

Breaking News: 'NDA' मधील चार घटक पक्ष India आघाडीत सामील होणार, काँग्रेसचा मोठा दावा

National Political News: 'NDA' मधील चार घटक पक्ष India आघाडीत सामील होणार, काँग्रेसचा मोठा दावा

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

National Political News: एनडीए मधील चार घटक पक्ष हे निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीटमध्ये सामील होणार, असा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आलोक शर्मा यांनी नागपुरात येथील पत्रकार परिषदेत केला आहे. अमेठीच्या जागेवर काँग्रेसचा ब्लॉक अध्यक्षही निवडणूक लढला तर स्मृती इराणी यांचं डिपॉझिट जप्त होईल, असंही आलोक शर्मा म्हणाले.

इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर अनेक वर्षानंतर एनडीएने (National Democratic Alliance ) बैठक घेतली असून भाजप नेताच म्हणाले की एनडीएमध्ये 38 पक्ष कुठून आले हे माहीत नाही, असंही प्रवक्ते आलोक शर्मा म्हणाले आहेत.

एनडीए आघाडीची कुठलीच बैठक गेल्या अनेक वर्षांपासून झाली नव्हती. पण इंडिया आघाडीची पाटण्यात बैठक झाल्यानंतर एनडीएने बैठक घेतली. देशातील विरोधी पक्ष आणि लोक जे इंडियासोबत आहे. तसेच एनडीएतील चार घटकपक्ष हे निवडणुकीपूर्वी इंडिया सोबत सहभागी होतील, असाही दावा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आलोक शर्मा यांनी केलाय. ते नागपुरात रविभवन येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. मात्र त्यांनी चार घटकपक्षाचे नाव सांगण्यास नकार दिला आहे.  (Latest Marathi News)

जेव्हा जेव्हा थर्ड फ्रंटच्या गटबंधनचे नेतृत्व काँग्रेस किंवा भाजपने लीड केले नाही. तेव्हा ते गटबंधन जास्त काळ टिकू शकले नाही, हा इतिहास आहे. यावेळी एनडीए विरुद्ध इंडियाचा निवडणुकीत जोरदार जुगलबंदी आणि समोरासमोर लढाई होईल. साडेचारशे जागा आम्ही जिंकू असाही दावा काँग्रेसचे नेते आलोक शर्मा यांनी केला.

अमेठीची जागा ही काँग्रेसची पारंपारिक सीट आहे. गांधी परिवाराचे अमेठीच्या जनतेसोबत एक कौटुंबिक नातं आहे. गांधी परिवारातून त्या जागेवर निवडणूक लढावी अशी अमेठी जनतेची अपेक्षा आहे. गांधी कुटुंबामधून त्या जागेवर लढावं की नाही? कोण लढणार? या संदर्भात राहुल गांधी आणि परिवार निर्णय घेईल. त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT