Sudhir Tambe  Saam Tv
महाराष्ट्र

Sudhir Tambe : काँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

Sudhir Tambe News : नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी ऐनवेळी अर्ज दाखल न केल्यामुळे काँग्रेस पक्षाने कारवाई केली आहे.

काँग्रेसने डॉ. तांबे यांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने शिस्तभंगांची कारवाई केली आहे. पक्षाने कारवाई केल्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

डॉ. सुधीर तांबे म्हणाले, ' काँग्रेस पक्षाचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत मला काहीही बोलायचं नाही'. तर दुसरीकडे सुधीर तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यावरून तांबे म्हणाले, 'मी भाजपा मध्ये जाणार चर्चा खरी नाही. आम्ही भाजपाला पाठिंबा मागितला नाही. मी पक्षाविषयी काहीही बोलणार नाही. मला जर पक्ष श्रेष्ठींनी बोलावलं, तर मी भूमिका मांडायला जाईल'.

टीडीएफ या शिक्षक संघटनेच्या पाठिंब्यावर भाष्य करताना तांबे म्हणाले, 'टीडीएफ शिक्षक संघटनेने मला पहिल्यापासून पाठिंबा दिला. प्रत्येक संघटनेची एक कार्यपद्धती असते, त्यानुसार त्यांचा निर्णय होईल'.

दरम्यान, डॉ. सुधीर तांबे यांनी शिस्तभंग कारवाईनंतर ट्विट करत देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे, अशा आशयाचे ट्विट डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakup Tips: पार्टनरला न दुखावता कसं कराल ब्रेकअप? या सोप्या टीप्स करतील तुमची मदत

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ची 400 कोटींच्या क्लबमध्ये थाटात एन्ट्री, रणवीर सिंह अन् अक्षय खन्नाची जोडी सुपरहिट

Maharashtra: वर्षभर शाळेतच नाहीत,७ शिक्षकांनी फुकटाचा पगार घेतला, महाराष्ट्रातील धक्कादायक वात्सव

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Mobile WiFi: घराबाहेर पडताच मोबाइलचा वायफाय बंद करा, अन्यथा डोकं झोडून घ्यावं लागेल! कारण काय?

SCROLL FOR NEXT