Loksabha Election 2024: Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: काँग्रेसला धक्का! लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने माजी आमदाराचा पक्षाला रामराम

Loksabha Election 2024: गडचिरोलीमध्ये कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला असून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचा पक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. गडचिरोली-चिमूर क्षेत्रातून उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत आपला राजीनामा दिला आहे.

Gangappa Pujari

मंगेश भांडेकर, गडचिरोली|ता. २६ मार्च २०२४

Gadchiroli Chimur Loksabha Election News:

राजकीय वर्तुळात सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे लोकसभेची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना राज्यातील काँग्रेसची गळती काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. गडचिरोलीमध्ये कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला असून माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांचा पक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. गडचिरोली-चिमूर क्षेत्रातून उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत आपला राजीनामा दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गडचिरोलीतील काँग्रेसचे (Congress) नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव आणि आदिवासी काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट न दिल्याने ते नाराज आहेत..

डॉ. नामदेव उसेंडी हे 2008 पासून काँग्रेसमध्ये असून 2009 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेस तर्फे लोकसभा लढवली होती. मात्र त्यांना दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला. आताही ते इच्छुक होते, मात्र बाहेर जिल्ह्यातील गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच पक्ष सोडण्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत. (Maharashtra Loksabha Election 2024)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"२०१४च्या मोदी लाटेत कोणी इच्छुक नसतानाही मी लढलो. ३ लाख मते घेतली. त्यानंतर सतत ५ वर्ष या मतदारसंघात काम केले. त्यानंतर २०१९च्या लोकसभेत १ लाखाने मतदान वाढले. त्यानंतरही मी सतत जनसंपर्कात होतो. मात्र स्थानिक राजकीय गटबाजीमुळे मला गडचिरोली चिमुर लोकसभेचे तिकीट मिळाले नाही," यामुळेच मी राजीनामा देत असल्याचे नामदेव उसेंडी यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: AI द्वारे बनवला बहीण-भावाचा अश्लिल व्हिडीओ, नंतर केलं ब्लॅकमेल; तरुणाची आत्महत्या

Shocking: मी जगू शकत नाही...; बायको प्रियकरासोबत पळून गेली, वकिलाने संपवलं आयुष्य

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर; अय्यरला नेमकी दुखापत काय झाली, कधी होईल ठणठणीत?

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT