Bhagat Singh Koshyari On SC Saam Tv
महाराष्ट्र

Bhagat Singh Koshyari On SC : सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले...

सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले...

Satish Kengar

Bhagat Singh Koshyari On SC : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, ''त्यामुळं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या पत्रावरुन राज्यपालांनी कारवाई सुरु करणं चुकचं होतं.'' त्यांच्यावर न्यायालयाने आणखीही टिप्पणी केली आहे. यावरच आता भगतसिंह कोश्यारी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Bhagat Singh Koshyari On SC : काय म्हणाले भगतसिंह कोश्यारी?

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, ''मी राज्यपाल पदापासून मुक्त होऊन तीन महिने झाले आहेत. मी सध्या राजकीय मुद्द्यांपासून स्वतःला दूर ठेवतो. जे प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं, त्यावर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय सुनावला आहे. त्या निर्णयावर जे तज्ज्ञ आहेत ते बोलतील. यावर मी काय बोलू? कारण मी कायद्याचा विद्यार्थी नाही. मला फक्त संसदीय पद्धती माहित आहे. त्यानुसार मी त्यावेळी जे निर्णय घेतले, विचारपूर्वक घेतले.''  (Breaking Marathi News)

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''जर कोणी माझ्याकडे त्याचा राजीनामा सुपूर्द केला. तर त्याला मी काय म्हणू, नको देऊ राजीनामा?'', असं ही ते म्हणाले आहेत.

SC On Bhagat Singh Koshyari : सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

निकाल देताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, "महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घेतलेले निर्णय हे भारतीय राज्यघटनेनुसार नव्हते. असंतुष्ट आमदारांना सरकारला पाठिंबा काढून घ्यायचा आहे, असं सूचित करणाऱ्या कोणत्याही संवादावर राज्यपालांनी भूमिका घेता कामा नये.''

सरन्यायाधीश चंद्रचूड पुढे म्हणाले, ''उद्धव ठाकरेंनी बहुमत गमावलं असल्याचा निष्कर्ष काढण्यासाठी राज्यपालांनी शिंदे गटाच्या ठरावावर अवलंबून राहिले ही त्यांनी चूक होती.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई अन् जिंकली मॅरेथॉनची ‘दौड’

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

NCMC Card : आजपासून नियम बदलला! 'या' महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद; घ्यावे लागणार पूर्ण तिकीट, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT