mahesh pilankar case  Saam tv
महाराष्ट्र

kolhapur shocking : मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती? पाटेगावचा माजी सरपंच तब्बल २ महिन्यांपासून बेपत्ता

kolhapur news : महाराष्ट्रात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होतेय का असा सवाल आता उपस्थित होतोय.. कारण कोल्हापुरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर तब्बल 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत... त्यामुळे पिळणकर कुटुंबियांनी न्याय मिळवण्यासाछी नेमकं काय केलयं... पोलिसांच्या कार्यक्षमेवर का सवाल उपस्थित केला जातोय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

ही घोषणाबाजी आहे... पाटगावचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य असणाऱ्या महेश पिळणकरांसाठी... कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या ७ जानेवारीला सकाळी कामानिमित्त घरातून बाहेर पडले. मात्र रात्र झाली तरी पिळणकर घरी न आल्यानं कुटुंबियांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र दोन महिने उलटूनही त्यांचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मस्साजोगच्या सरपंच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झालीय.

कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या ७ जानेवारीला सकाळी कामानिमित्त घरातून बाहेर पडले. मात्र रात्र झाली तरी पिळणकर घरी न आल्यानं कुटुंबियांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र दोन महिने उलटूनही त्यांचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मस्साजोगच्या सरपंच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झालीय.

कारण बेपत्ता झाल्यानंतर 8 दिवसांनंतर पिळणकारांची दुचाकी या परिसरातील एका शेतात सापडली. तिथेच काही अंतरावर काहीतरी जाळल्याच्या खुणाही पोलिसांना आढळल्या. मात्र या पलीकडे तपासात ठोस प्रगती झालेली न झाल्यानं कुटुंबियांनी पोलिसांविरोधातच निदर्शनं केली.

महेश पिळणकर यांचा राजकीय क्षेत्रात वावर होता. आगामी पंचायत समिती निवडणूक त्यांनी लढवावी असा आग्रहही त्यांच्या मित्रांकडून होत होता. त्यामुळे या प्रकरणामागे काही गंभीर कटकारस्थान तर नाही ना अशी भीती व्यक्त केली जातेय. निर्दशन केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेतलीय. आणि स्वतंत्र अधिकारी नेमून विशेष पथक स्थापन करण्याचं आश्वासन दिलंय

कोल्हापूरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात जिथे कायदा सुव्यवस्थेचा दरारा असतो, तिथे एका लोकप्रतिनिधीचा थांगपत्ता न लागण हे थेट प्रशासनाचं-पोलीस यंत्रणेच अपयश आहे. मात्र मस्साजोगच्या सरपंच प्रकरणाची राज्यात पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांना याचा त्वरित छडा लावण गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Periods Care : पीरियड्समध्ये चुकूनही खाऊ नका 'ही' फळे, उद्भवतील गंभीर समस्या

Panic Attack Remedies : पॅनिक अटॅक आल्यावर घाबरू नका, पटकन करा 'हा' उपाय

Maharashtra News Live Update: हडपसरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांचा चोप; गांधी चौकात रात्री घडला थरार

Thane : ठाण्यात बिबट्याची दहशत! वागळे इस्टेट परिसरात पाणी पिताना दिसला; व्हिडिओ व्हायरल

Vijay thalapathy: सुपरस्टार ते मुख्यमंत्री! थलापती विजय यांनी घेतली शपथ; वडिलांना अश्रू अनावर, पाहा भावूक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT