Gondia Politics Saam Tv
महाराष्ट्र

Gondia Politics: 'देवेंद्र फडणवीस यांनी फोन उचलला नाही म्हणून मी भाजप सोडली'

Ramesh Kuthe on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी फोन न उचल्याने भाजप सोडली, असं माजी आमदार रमेश कुथे म्हणाले आहेत. ते लवकरच काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा आहे.

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख, साम टीव्ही, गोंदिया प्रतिनिधी

गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तसेच विद्यमान भाजप नेते रमेश कुथे यांची काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी १५ जूनच्या मध्य रात्री कुथे कुटूंबियांची घरी जात भेट घेतली होती. यामुळे गोंदियाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. अशातच नाना पटोले यांनी रात्रीच्या अंधारात खेळलेला खेळ यशस्वी करून दाखवला.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रमेश कुथे यांनी भाजप सोडत असल्याची घोषणा केली आहे. याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले आहेत की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा, विधानसभा, तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत आश्वासन देऊनही मुलाला तिकीट तर दिली नाही. तर दुसरीकडे माझा फोन देखील उचलला नाही. म्हणून मी भाजप सोडत असल्याचं ते म्हणाले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुका पाहता गोंदिया विधानसभेत ओबीसी चेहऱ्याची मागणी होत असताना मागील आठवड्यात नाना पटोले हे गोंदियात एका लग्न समारंभात आले होते. यावेळी त्यांनी कुथे कुटूंबियांची भेट घेतल्याने गोंदियाच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

तर रमेश कुथे यांचे सुपुत्र सोनू कुथे हे गोंदिया विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने ही भेट राजकीय वर्तुळात खडबड उडविणारी असल्याचे बोलले जात होते. माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजप सोडल्याने ते लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd in winter: हिवाळ्यात दही खाताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: अमित साटम यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

शिक्षणासाठी घरातून पळाली अन् रेड लाइट एरियात अडकली; तिथून निसटली, पण शेतात काढावी लागली अख्खी रात्र

Local Body Election: शिर्डीत अपक्ष महिला उमेदवाराला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण

Politics : पोलिसांची मोठी कारवाई, भाजपच्या महिला नेत्याला घेतलं ताब्यात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT