uddhav Thackeray in shivsena meeting  saam tv
महाराष्ट्र

'हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा', उद्धव ठाकरेंचा इशारा

शिंदे-फडणवीस' नवनिर्वाचीत सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत जोरदार फटकेबाजी सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : महाराष्ट्रात 'शिंदे-फडणवीस' नवनिर्वाचीत सरकार स्थापन झाल्यानंतर (Eknath Shinde) एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत जोरदार फटकेबाजी सुरु आहे. काल रविवारपासून विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. शिंदे सरकारने १६४ विरुद्ध १०७ मतांनी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक जिंकली. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्षपदी काल विराजमान झाले. आजही शिंदे-फडणवीस सरकार बहुमत चाचणीत पास झाले. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली असून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तळागाळातील शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधायला सुरुवात केलीय. आज शिवसेना भवनमध्ये शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांसोबत बैठक पार पडली. भाजपचा शिवसेनेला (Shivsena) संपवण्याचा डाव आहे. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असा इशारा ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांसोबत बैठक घेतली. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे म्हणाले, लढायचे असेल तर सोबत राहा. आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल. ठाकरे पुढे म्हणाले, घटना तज्ज्ञांना विनंती आहे आपण घटनातज्ञ आहात.

सध्या जे सुरु आहे, ते घटनेला धरून सुरु आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे. त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे, त्याबाबत सर्वांना सत्य बोलू द्या. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे. भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ.हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असा इशाराही ठाकरे यांनी शिंदे सरकारला दिला.

शिंदे सरकार पाच ते सहा महिने टिकेल

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारबाबत नुकतीच प्रतिक्रिया दिली होती. राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल, त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आता विरोधी बाकावर बसणार असलो, तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना स्पष्ट होईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडलं तर मध्यवर्ती निवडणुका लागतील. त्यामुळे त्याची तयारी आतापासून करा'. असं पवार म्हणाले होते.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT