Self immolation saam tv
महाराष्ट्र

अहमदनगरमध्ये खळबळ! प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळं जेष्ठ माजी सैनिकाचा आत्मदहनचा प्रयत्न

नरेश शेंडे

अहमदनगर : जिल्ह्यात खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषदेच्या आवारात (former soldier) माजी सैनिकानेआज अंगावर रॉकेल ओतून (Tries to ends life) आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. घराशेजारील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी अनेकदा तक्रार करुनही प्रशासन कारवाई करत नसल्याने माजी सैनिक (Diwakar sayaji Makasare) दिवाकर सयाजी मकासरे (74) वर्ष यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. मकासरे यांना हे कृत्य करताना नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात उभे असलेल्या नागरिकांनी पाहिल. त्यानंतर नागरिकांना तातडीनं मकासरे यांना रोखल्याने त्यांचा जीवाला धोका निर्माण झाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाकर मकासरे यांनी 17वर्ष भारतीय सैन्यदलात सेवा केली आहे. 1971 च्या पाकिस्तान विरुद्धच्या लढाईत त्यांनी देशसेवा केली आहे.तसंच सेवानिवृत्त झाल्यानंतर मकासरे कोपरगाव शहरातील निंबारा मैदान येथे राहायला गेले.शेजारिल नागरिकाच्या अतिक्रमणाचा नाहक त्रास होत असल्याने 2016 पासून त्यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी तसंच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.

संबंधीत प्रशासनाने तक्रारीची दखल घेतली नसल्याने टोकाचं पाऊल उचललं, असं मकासरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. दिवाकर मकासरे यांनी पालिका आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला असता, त्यांची मुख्याधिकारी यांनी समजूत काढली व तत्काळ सदर ठिकाणी भेट देऊन वादावर तोडगा काढला, अशी प्रतिक्रिया कोपरगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिलीय.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जागा वाटपाला घटस्थापनेचा मुहूर्त! महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला, 'मविआ'चे गणित काय? वाचा...

IIBF Recruitment : महिना ९१३०० रुपये पगार, IIBF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

BMC Bharti: मुंबई महापालिकेत तब्बल ९२००० पगाराची नोकरी, शिक्षण अन् वयाची अट काय? जाणून घ्या

Shivsena News : बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक हरपला; ठाकरे गटाच्या माजी आमदाराचे निधन

PM Mudra Loan: तरुणांनो बिनधास्त व्यवसाय सुरु करा, सरकार देतंय 10 लाखांपर्यंतचे कर्ज; कसा घेता येईल लाभ?

SCROLL FOR NEXT