gadchiroli, sirancho, tortoise, forest department saam tv
महाराष्ट्र

Tortoise : बसस्थानक परिसरात आढळलं पाेतं; पाेलिसांमुळं २१ कासवांना मिळालं जीवदान

हे पोते कोण आणि कुठे घेऊन जात होते, याचा शोध वनविभाग करत आहे.

संजय तुमराम

गडचिरोली : गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यातील सिरोंचा (sirancho) तालुक्यात गस्तीवर असलेल्या पोलिस (police) पथकाच्या सतर्कतेमुळे सुमारे २१ कासवांना जीवदान मिळाले. ही कासवे विक्रीसाठी नेली जात होती. (Gadchiroli Latest Marathi News)

यंदा २८ जुलै ते तीन ऑगस्टदरम्यान नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू आहे. त्या अनुषंगाने सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक गस्तीवर होते. त्यांना स्थानिक बसस्थानकाच्या परिसरात एक पोते बेवारस स्थितीत पडून दिसले.

tortoise saved by forest department.

याबाबत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दक्षता बाळगून पाहणी केली असता त्यात २१ जिवंत कासवं आढळून आली. ही बाब वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू यांना माहिती देण्यात आली. कटकू यांनी आपल्या चमूसह दाखल होऊन ती कासवे भरलेले पोते ताब्यात घेतले.

पाहणी केल्यावर कासवाच्या तोंडाला आकडे (गळ) लटकून असल्याचे लक्षात आले. मासेमारी करताना ही कासवे गळाला लागली असावीत, असा अंदाज आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व कासवांच्या तोंडातील आकडे काढून त्यांच्यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर कासवांना प्राणहिता नदीत सोडण्यात आले. हे पोते कोण आणि कुठे घेऊन जात होते, याचा शोध वनविभाग करत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish- Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' १ नंबर ! रितेशच्या चित्रपटाने 'सैराट'लाही पछाडलं, रेकॉर्ड ब्रेक करत कमावले तब्बल 'इतके' कोटी

Maharashtra News Live Update: नाशिक शहरातील काही भागात आज पाणीबाणी

Career options after 12th: रिझल्टनंतर गोंधळात पडू नका! १२ वी नंतरचे टॉप करिअर ऑप्शन

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा मतदानाला सुरूवात, 15 बुथवर का होतेय फेरमतदान ?

Maharashtra Weather : राज्याला अवकाळी पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; पुढील काही दिवस महत्त्वाचे

SCROLL FOR NEXT